1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर परवा बांधणार ‘घड्याळ’

surekha punekar
Spread the love

राज्यातील कलाक्षेत्रास राजकारणाचे वावडे फार आधीपासून आहेच त्यात भर म्हणून लवकरच लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर राजकारणात प्रवेश करणार आहेत. सुरेखा पुणेकर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत परवा 16 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. सुरेखा पुणेकर यांच्यासोबतच अन्य 16 कलाकारही मनगटावर राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातावर बांधणार आहेत.

सुरेखा पुणेकर यांनी काही दिवसांपूर्वी विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाकडून बिलोली विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्याचबरोबर त्या एका मेळाव्यात शिवसंग्रामच्या व्यासपीठावरही बसल्या होत्या. दरम्यान, याआधीही प्रिया बेर्डे, विजय भाटकर, आनंद शिंदे यांच्यासह अनेक कलाकारांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.

सुरेखा पुणेकर गेल्या अनेक महिन्यांपासून राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यांनी स्वतः जुलै महिन्यात विधानसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.

सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी प्रवेशाबाबत बोलताना म्हणाल्या की, येत्या 16 सप्टेंबरला मी चित्रपट, साहित्य, कला, सांस्कृतिक विभाग मुंबई अध्यक्ष मनोज शंकर व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. आतापर्यंत मी कलेची सेवा केली. आता मला राजकारणातून जनतेची सेवा करायची आहे. महिलांचे, गोरगरिबांचे प्रश्न सोडवायेच आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 16 सप्टेंबरला मला प्रवेश करायचा आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी कोणाचे अर्ज दाखल; पाह...

    June 16th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: देशात राष्ट्रपती निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये उमेदवार निवडीवरून चर्चा, ब...

    एसटी कर्मचा-यावर मेस्मा कारवाई होणार

    December 4th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveलालपरीचा संप मिटल्यात जमा एसटी कर्मचाऱ्यांचे सरकार मध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी गेल्या 25 दिवसांपासून कर्म...

    लैंगिक उद्देशाने केलेला कोणताही स्पर्श हे शोषणच

    November 18th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाचा ‘तो’ वादग्रस्त निर्णय केला रद्द पॉस्को कायद्यांतर्गत लैंगिक अत्याचाराच्य...