मुंबई- आम्हाला दोन तृतीयांश बहुमत आहे. १६६ आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे आमचे सरकार पडणार, हे संजय राऊत यांना पडलेले स्वप्न आहे. त्यांना स्वप्नातच राहू द्या, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला. आज शिंदे यांनी लीलाधर डाकेंची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
अनेक आमदार-खासदार मानसिकरित्या सध्याच्या सरकार सोबत नाहीत. ते संभ्रमावस्थेत आहेत. आज गेलेले अनेक आमदार आमच्या संपर्कात असून, भविष्यात महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्तापरिवर्तन झाल्यास आश्चर्य वाटायला नको, असे विधान खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्याच्या या विधानावर मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रया दिली आहे. शिंदे म्हणाले की, आमचे सरकार मजबूत आहे. १६६ आमदारांचा आम्हाला पाठींबा आहे.
संजय राऊत स्वप्न पाहत आहेत. त्यांना स्वप्नातच राहू द्या, असा टोला त्यांनी लगावला. तसेच डाकेंच्या भेटीबद्ल बोलताना त्यांनी फक्त सदिच्छा भेट घेतली असल्याचे म्हटलं आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटींचा सिलसीला सुरूच असताना शिंदे यांनी आज डाकेंची भेट घेतली. त्यामुळे शिवसेनेचे आमदार व खासदार यांच्यानंतर ज्येष्ठ नेतेही शिंदे गटात सामिल होणार का? असा सवाल उपस्थित केला आहे..