आज रूपाली चाकणकर चंद्रपूर दौ-यावर
आम्ही मुंबईच्या पोलिस आयुक्तांना सत्यस्थिती अहवाल मागितला आहे. पाेलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. मी पाेलिसांच्या संपर्कात आहे. मला पाेलिसांनी सांगितलं आहे या संदर्भात आरोपीस अटक करण्यात येईल असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्या महापौरांबाबत केलेले अवमानकारक वक्तव्याच्या प्रकरणी नमूद केले.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर आज (गुरुवार) चंद्रपुरात आल्या आहेत. भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौरांबाबत केलेले वक्तव्य अवमानकारक असल्याने आम्ही त्याची गंभीर दखल घेतल्याचे त्यांनी नमूद केले.
रुपाली चाकणकर म्हणाल्या शेलार यांच्यावर मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईच्या पोलिस आयुक्तांना या संदर्भातला सत्यस्थिती अहवाल मागितला आहे. शेलारांना अटक केली जाईल असे पाेलिसांनी आम्हांला आश्वासित केले आहे असेही चाकणकर यांनी नमूद केले.