नागपूर: जून महिना हा LGBTQ प्राईड महिना (Pride Month) म्हणून ओळखला जातो. ह्याच महिन्याचा अजून आनंद वाढवायला द फ्री मीडिया (The Free Media) आणि Click2Media कडून एक ‘Pride For All’ नावाचा एक इव्हेंट घेण्यात आला. सारथी ट्रस्ट, Matrix Ngo आणि VR, नागपूर यांच्या सहयोगाने ३० जून २०२२ रोजी संद्याकारी ६.३० च्या सुमारास LGBTIQ+ समूहासाठी कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमाचा उद्देश्य समाजात LGBTQ+ विषयी आदर, आपुलकी,आणि समानतेची गरज असा होता. नागपुरातील LGBTIQ+ समूहासाठी पहिल्यांदाच अशा प्रकारचा एक कार्यक्रम VR, नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता. Matrix Ngo ने एका धमाकेदार फ्लॅशमॉब ने कार्यक्रमाची सुरवात केली नंतर त्यांनी जागृतेकाचा संदेश देत एक ऍक्ट केला. Matrix Ngo ने केलेल्या प्रदर्शनात आपण सर्व समान आहोत, तसेच प्रत्येकाला त्याचे जीवन जगण्याचा अधिकार आहे असे दर्शविण्यात आले.
त्यानंतर द फ्री मीडिया (The Free Media) कडून पासिंग द पार्सल खेळ घेण्यात आला. त्यात सगळ्यांनी अगदी आनंदाने भाग घेतला. द फ्री मीडिया (The Free Media) कडून विजेतीला बक्षीस देखील देण्यात आले. पुढे कार्यक्रमात सारथी ट्रस्टचे सीईओ निकुंज जोशी यांनी प्राईड महिन्याचे महत्व सांगितले. त्यानंतर सारथी ट्रस्टचे आनंद चंद्रानी, विद्या कांबळे,मोहिनी, आदिल हे सदस्य समोर आलेत आणि त्यांनी स्वतःच्या आयुष्याचे खडतर आणि आनंदी क्षण सांगितले. आपल्या भावना व्यक्त केल्या. लोकांनी देखील त्यांच्या कहाण्या अगदी मन लावून ऐकल्या. जमलेल्या उत्साही लोकांपैकी देखील या कार्यक्रमात काही जण सहभागी झाले. पलक नावाच्या मुलीने एक सुंदर आणि समाजात हिमतीने पुढे जाणारी एक कविता गायली.
द फ्री मीडिया (The Free Media) आणि Click2Media कडून Matrix Ngo आणि सारथी ट्रस्टला मोमेन्टो देण्यात आला. या सर्व कार्यक्रमाचे संचालन द फ्री मीडियाच्या रेणुका किन्हेकर आणि निशा हिरानी कडून करण्यात आले होते.