नागपूर: लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे पुढील लष्करप्रमुख असतील आणि ते जनरल एमएम नरवणे यांची जागा घेतील, जनरल एमएम नरवणे यांचा कार्यकाळ 30 एप्रिल रोजी संपत आहे. लेफ्टनंट जनरल पांडे सध्या लष्कराचे उपप्रमुख आहेत. लष्कराचे उपप्रमुख होण्यापूर्वी ते लष्कराच्या पूर्व कमांडचे प्रमुख होते.
अनेक भागात दहशतवादविरोधी कारवायांमध्ये भाग घेतला:-
लेफ्टनंट जनरल पांडे यांची डिसेंबर १९८२ मध्ये बॉम्बे सॅपर्समध्ये नियुक्ती झाली. आपल्या गौरवशाली कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आणि विविध भागात दहशतवादविरोधी कारवायांमध्ये भाग घेतला. जम्मू आणि काश्मीरमधील ऑपरेशन पराक्रम दरम्यान त्यांनी नियंत्रण रेषेवर एका इंजिनियर रेजिमेंटचे नेतृत्व केले. याशिवाय, त्यांनी पश्चिम लडाखच्या उच्च प्रदेशात माउंटन डिव्हिजन आणि ईशान्येकडील एका सैन्यदलाचे नेतृत्व केले.
a
जनरल पांडे यांनी इथिओपिया आणि इरिट्रियामधील संयुक्त राष्ट्रांच्या मिशनमध्ये मुख्य अभियंता म्हणूनही काम केले आहे. ते जून 2020 ते मे 2021 पर्यंत अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर-इन-चीफ होते. त्यांच्या विशिष्ट सेवेबद्दल त्यांना परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित झालेले आहे.