भारतात कोरोना विषाणूचे केसेस वाढायला सुरवात झाली आहे. एका दिवसात कोरोना रुग्णांनाचे केसेस २२.५ टक्क्यांनी वाढले आहे. मागील २४ तासात कोविड-१९ चे ३३,७५० नवीन केसेस समोर आले आहेत. सोबतच देशात कोरोनामुळे संक्रमित झालेल्यांची संख्या ३४,९२२,८८२ झाली आहे. ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून १४५,५८२ झाली आहे. मागील २४ तासात १०,८४६ लोकांचा मृत्यू झालं आहे. आतापर्यंत कोरोनामुळे एकूण ३४,२९५,४०७ लोक ठीक झाले आहे. आता साध्य रिकव्हरी रेट ९८. २० टक्के आहे.
कोरोनाच्या नवीन वैरिएंट ओमिक्रोनचे एकूण भारतात १७४० लोक संक्रमित झाले आहे. रविवारला ओमिक्रोनमुळे ग्रसित झालेल्या रुग्नांची संख्या १५२५ इतकी होती. ओमिक्रोन वैरिएंटमुळे ६४८ रुग्ण ठीक झाले आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्ती ओमिक्रोन रुग्ण आहे. महाराष्ट्रात ओमिक्रोन रुग्णांची संख्या ५१० आहे. दुसऱ्या नंबरवर दिल्ली जिथे ओमिक्रोनचे एकूण ३५१ केसेस आहेत. गुजरात येथे १३६ तर राजस्थान येथे १२२ केरळ येथे १५६ ओमिक्रोनचे रुग्ण आहेत.
Credits: graph inspired by India Today
कोरोनाचं संकट वाढल्यानं चिंता वाढलीय आणि नागरिकांनी आता हे संकट गांभीर्यानं घेण्याची आवश्यकता आहे असा इशारा केंद्र सरकारने राज्य सरकारांना दिला आहे. अगदी सर्दी, डोकेदुखी आणि घशात खवखव असेल तरी कोरोनाची चाचणी करून घ्या, अशा सूचना केंद्र सरकारनं केल्यात. आरटीपीसीआर चाचण्यांना उशीर होऊ शकतो, त्यामुळे रॅपिड अँटिजेन टेस्ट करा, असंही त्यांनी सूचवलं आहे.