म.रा. जुनी पेन्शन हक्क संघटन वर्धेच्या वतीने दिनांक 26 सप्टेंबर 2021 च्या आमसभेपूर्वी शिष्टमंडळाने मा.अध्यक्ष/संचालक/व बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी सस्नेह भेट घेतली.
आयोजित भेटीमध्ये खालील मुद्द्यांच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली वर्धा जिल्हा परिषद एम्पलॉईज अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड वर्धा येथे सध्या कर्जदार सभासदाचा अपघाती विमा उतरविला जातो. परंतु कर्जदार सभासदाचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या मिळणाऱ्या लाभाच्या रकमेतून त्याच्या कुटुंबाला सदर कर्जाची रक्कम भरावी लागते. अशा वेळेस बँकेने नैसर्गिक विमा उतरविल्यास त्याच्या कुटुंबाला मिळणाऱ्या लाभाच्या रकमेतून त्याचे कर्ज भरावे लागणार नाही,इतर जिल्हा बँका,पतसंस्था यांच्या धर्तीवर आपल्याही बँकेत नैसर्गिक विमा कशाप्रकारे आणता येईल यासंबंधी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब समवेत मा.वर्हाडे सर (संचालक)यांच्याशी विस्तृत चर्चा करण्यात आली व महाराष्ट्रातील इतर जिल्हा बँकेत कार्यन्वित असलेल्या योजना संबंधात चर्चा करण्यात आली तेव्हा या संबंधाने नक्कीच येत्या काळात प्रत्येक कर्जदार सभासदासाचा कर्जाच्या प्रमाणात नैसर्गिक विमा उतरविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब व संचालक श्री.व-हाडे सर यांनी कळविले.
2005 नंतर लागलेल्या डीसीपीएस/एनपीएस धारक सभासदांसाठी मृत्युपश्चात सध्या बँकेत एक लाख रुपयाची सानुग्रह अनुदान योजना होती,परंतु ही रक्कम फार तोकडी असल्यामुळे व सदर सभासदांना जुनी पेंशन नसल्यामुळे येत्या आमसभेमध्ये ही रक्कम कमीत कमी तीन लाख रुपये करण्यात यावी,अशी विनंती शिष्टमंडळातर्फे करण्यात आली.यावर येत्या आमसभेमध्ये सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कळविले आहे.
दिनांक 1 सप्टेंबर 2021 पासून बँकेच्या कर्जावर लागू करण्यात आलेले नवीन व्याजदर जुन्या कर्जाला ही लागू करण्यात यावे,या संबंधीची विनंतीही यावेळी करण्यात आली. नागपूर,अमरावती,सिंधुदुर्ग, अहमदनगर,नाशिक आणि गोंदिया आधी जिल्ह्यांच्या बँका पतसंस्था येथे कर्जदार सभासदांकरिता असलेल्या योजनांची विस्तृत चर्चा या वेळी करण्यात येऊन त्या धर्तीवर आपल्या बँकेत सभासद कल्याणाकरिता कोणती योजना आणता येईल या संबंधाने मा.अध्यक्ष महोदय/मा.वर्हाडे सर/मा.CEO यांना अवगत करुन सदर योजना शिघ्रातिशिघ्र लागु करण्याची विनंती करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रफुल कांबळे,राज्य संपर्कप्रमुख सुशील गायकवाड, नागपुर विभागीय सचिव हेमंत पारधी,जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णा तिमासे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्री.आशिष बोटरे, जिल्हा कार्यालयीन चिटणीस मनोज पालीवाल, समुद्रपूर तालुका अध्यक्ष समीर वाघमारे हे उपस्थित होते.