नागपूर: विदर्भात यंदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम येथे बुधवारपर्यंत येलो अलर्ट (yellow alert) आहे. तर वर्धा, अमरावती आणि अकोला येथे आज ऑरेंज अलर्ट (orange alert) जारी करण्यात आला आहे. आज १९ जुलै रोजी महाराष्ट्र्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister of Maharashtra Devendra Fadnavis) यांनी वर्धा आणि चंद्रपूर येथील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली.
या ठिकाणी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये लोकांना वाचविण्याचे काम यंत्रणा करत आहे. दुबार पेरणी सुद्धा संकटात आली आहे. यावेळेस शेतकऱ्यांना दिलासा देत योग्य मदत राज्य सरकारतर्फे दिली जाईल असे देखील सांगितले. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात खेडगाव येथील नाल्याला पूर आला आणि त्यामुळे शेतीचे नुकसान झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister of Maharashtra Devendra Fadnavis) आज या ठिकाणी भेट देत नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील, असे त्यांनी सांगितले.
महाकाली नगर येथे नाल्याच्या पुराचे पाणी अनेक घरांमध्ये शिरले,काही घरं जलमय झाली.या भागास भेट देत पाहणी करीत सर्व पीडित नागरिकांशी उपमुख्यमंत्र्यांनी संवाद साधत त्यांना धीर दिला. हिंगणघाट नगरपरिषदेने अतिवृष्टीग्रस्त पीडितांसाठी निवार्याची व्यवस्था केली आहे. तेथे वास्तव्यास असलेल्या कुटुंबीयांशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेत प्रशासनाला योग्य त्या सूचना केल्या.”निकषाच्या बाहेर जाऊन मदत करण्याचे निर्णय यापूर्वी सुद्धा आम्ही घेतले आहेत. त्यामुळे शेतकर्यांना अधिकाधिक मदत कशी मिळेल, याचा निर्णय केला जाईल”, असेही ते म्हणाले. कान्होली येथील निवारा केंद्राला भेट दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
हिंगणघाट शहरात जीबीएमएम हायस्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे अतिवृष्टीग्रस्तांसाठी निवास आणि भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस( Deputy Chief Minister of Maharashtra Devendra Fadnavis)यांनी त्याठिकाणी सुद्धा भेट देत नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांचे दु:ख जाणून घेतले. १८ जुलै पर्यंतच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे मृतांची संख्या १०५ वर पोहोचली होती.
Message news-approved