1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

महाराष्ट्र जनुक कोष कार्यक्रम देशाला दिशा देणारा प्रकल्प – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Spread the love

महाराष्ट्र जनुक कोष (जीन बँक) कार्यक्रम राबविणारे आपले राज्य देशातील पहिले आहे. या कोषाबाबत राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाने मजबूत पाया बनविला आहे. या कार्यक्रमामधून देशाला दिशा दाखविण्याची अभिमानास्पद कामगिरी केली जाते आहे, असे गौरवोद्गार काढतानाच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे काम अव्याहतपणे सुरु राहावे यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात कायमस्वरुपी तरतूद करण्याचे निर्देश दिले. ‘हे काम म्हणजे आपले भवितव्य आणि भविष्यासाठी आहे. वातावरणीय बदलाच्या आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देणाऱे पिकांपासून ते मासे, पशुधन यांचे वाण जतन संवर्धनाचे प्रयत्न करावेच लागतील, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.

आयोगाच्या वतीने महाराष्ट्र जनुक कोष (जीन बँक) कार्यक्रम प्रकल्पाचा कार्यपूर्ती अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत वर्षा येथील समिती सभागृहात सादर करण्यात आला. याप्रसंगी आयोगाचे अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देवाशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, पशू संवर्धवन व दुग्ध विकास विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांच्यासह महाराष्ट्र जैव विविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ. शेषराव पाटील, बायएफचे अध्यक्ष गिरीष सोहनी, आयआयएसईआर, पुणेचे प्रोफेसर व्ही. एन. राव, जैव विविधता मंडळाचे सदस्य प्रवीण श्रीवास्तव आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, आपल्या नेहमीच्या जगण्याच्या धापवळीत जैव विविधतेकडे दुर्लक्ष होते. अशा परिस्थितीत जीन बँकेच्या कार्यक्रमातून अभिमानास्पद काम सुरु आहे. देशातील अशी पहिली संस्था आणि पहिला प्रकल्प आहे, याचे विशेष कौतुक आहे. यातून देशाला दिशा देणारे कामगिरी होत आहे. आयोगाने जीन बँके कार्यक्रमातून कामाचा मजबूत असा पाया तयार केला आहे. त्यामुळे पुढे जाणे कठीण नाही.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    आता अशोक चव्हाण, अमित देशमुख, अर्जुन खोतकारांच्या मा...

    November 12th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्याचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकार राज्याच्या सत्तेवर आले, तेव्हापासून राज्यातील घोटाळेब...

    स्वतःचा पक्ष स्थापन करुन धनंजय मुंडेंविरोधात परळीतून...

    December 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर काही महिन्यांपूर्वी कथित आरोप करून ...

    भाजपाची ५ राज्यात निवडणूक प्रभारींची घोषणा

    September 8th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveभारतीय जनता पक्षाने पुढील वर्षी होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. पक्षाने ...