महाराष्ट्र विधान परिषद निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. विधान परिषदेमधून ६ जुलै २०२२ ते २१ जुलै २०२२ या कालावधीत निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या जागा भरण्यासाठी विधानपरिषदांच्या व्दैवार्षिक निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. महाराष्ट्रासोबतच उत्तर प्रदेश, आणि बिहार यह राज्यांसाठीही हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आणि बिहार विधानपरिषदांच्या ३० सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्या जागा भरण्यात येणार आहेत.
सदाशिव रामचंद्र खोत, सुजितसिंह मानसिंह ठाकूर, प्रवीण यशवंत दरेकर, सुभाष राजाराम देसाई, रामराजे प्रतापसिंह नाईक-निंबाळकर, संजय पंडितराव दौंड, विनायक तुकाराम मेटे, प्रसाद मिनेश लाड, दिवाकर नारायण रावते या सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. तर रामनिवास सत्यनारायण सिंह यांची जानेवारी पासून रिक्त असलेली जागासुद्धा याचवेळी भरली जाणार आहे.
या निवडणुकीसाठी अधिसूचना २ जून २०२२ रोजी जारी करण्यात येणार आहे. तसेच निवडणूक अर्ज भरण्याची अंतिम तारीख ९ जून २०२२ पर्यंत आहे. अर्जांची छाननी १० जून २०२२ रोजी होणार असून, १३ जून २०२२ पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. मतदान २० जून रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत होणाार असून त्याचदिवशी सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होणार आहे