महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा जिल्हा कोल्हापूरची महामंडळ सभा शुकवार दि.२९ आक्टोंबर २०२१ रोजी कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी, शाहूपुरी, कोल्हापूर येथे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे सर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली.
या सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. सौ रसिका पाटील मॅडम, अध्यक्ष शिक्षण सभापती जि. प. कोल्हापूर उपस्थित होते. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून सल्लागार मा. दा. शं. सुतार, मा. शिवाजी दादा पाटील, मा.पी.के. पाटील, मा.दिलीप बच्चे,मा.राजू जुगळे, मा.वसंत जोशीलकर, मा.रविंद्र नागटिळे, शिक्षक बँकेचे चेअरमन मा. आण्णासो शिरगांवे, व्हा.चेअरमन मा. बाजीराव कांबळे सर, अध्यक्ष संभाजी बापट, कार्याध्यक्ष वसंतरावजी जाधव, सरचिटणीस उत्तम सुतार, कोषाध्यक्ष मारुती गुरव, कार्यकारिणी जिल्हा संघ व सर्व संचालक मंडळ, सर्व तालुका अध्यक्ष, तालुका कार्यकारणी, सर्व पतसंस्थेचे चेअरमन उपस्थित होते . या सभेमध्ये ५ सप्टेंबर २०२० व ५ सप्टेंबर २०२१ या वर्षी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार व जे. पी. नाईक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा यथोचित गौरव करण्यात आला .
मा राज्याध्यक्ष श्री राजारामजी वरुटे सर यांनी आपल्या मनोगतात शिक्षक पगार एक तारखेला झालेच पाहिजे, जुनी पेन्शन मिळायलाच पाहिजे, बदल्या झाल्याच पाहिजे, बी एल ओ ऑर्डर रद्द झालेच पाहिजे, या व इतर सर्वच प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी शिक्षक संघ सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे मा वरुटे सरांनी सांगितले.
त्याचप्रमाणे सिका पाटील मॅडम, अमर पाटील साहेब, सुतार सर,श्री बाजीराव कांबळे सर, श्री शिवाजी पाटील सर, श्री दिलीप बच्चे सर, श्री संभाजी बापट सर, श्री वसंत जाधव सर, सर्व तालुका अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर संघटनेने केलेल्या कामाची चर्चाही महामंडळ सभेत करणेत आली.
या कार्यक्रमासाठी तालुका, नपा / मनपा सर्व पदाधिकारी सदस्य, जिल्हा कार्यकारिणी, सर्व तालुका कार्यकारिणी, सर्व शिक्षक पदाधिकारी, सर्व सदस्य, सर्व शिक्षक संघ