1. Coronavirus pandemic live updates: India reports a single-day rise of 253 new Covid cases in India 2. ‘I carry India with me wherever I go’: Google and Alphabet CEO Sundar Pichai 3. Aaftab used Chinese knife to dismember Shraddha's body, chopped her 1. कोरोनाव्हायरस (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला लाइव्ह अपडेट्स: भारतात एकाच दिवसात 253 नवीन कोविड प्रकरणांची नोंद झाली आहे 2. ‘मी जिथे जातो तिथे भारताला माझ्यासोबत घेऊन जातो’: गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई 3. श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी आफताबने चायनीज चाकू वापरला, आधी तिचे हात कापले: सूत्र

भारतातील सर्वात श्रीमंत राज्यांमध्ये ‘महाराष्ट्र’ अव्वल; हुरून इंडियाची यादी जाहीर

Huron India

मुबंई- भारतातील सर्वात श्रीमंत राज्यांपैकी महाराष्ट्र राज्य हे अव्वल ठरले आहे. ‘आयआयएफएल’ हुरून इंडियाने नुकत्याच जाहीर केलेल्या श्रीमंतांच्या यादीत ही माहिती समोर आली आहे.

2022 मध्ये महाराष्ट्रातील श्रीमंतांचा आकडा 335 वर पोहोचला आहे. 2021 च्या तुलनेत राज्यातील श्रीमंतांच्या आकड्यात 33 जणांची वाढ झाली आहे. ‘आयआयएफएल’ हुरून इंडियाने नुकत्याच जाहीर केलेल्या श्रीमंतांच्या यादीतील सर्वात तरुण 19-वर्षीय कैवल्य वोहरा ठरला आहे. कैवल्य वोहरा याने ‘झेप्टो’ची स्थापना केली.10 वर्षांपूर्वी यादीतील सर्वात तरुण 37 वर्षांचा होता. त्यानंतर आज जाहीर झालेल्या यादीत 19 वर्षांचा आहे. सॉफ्टवेअर कंपनी काँन्फ्ल्यूअंटच्या सह-संस्थापक, नेहा नारखेडे (37) तरुण महिला स्वयंनिर्मित उद्योजक आहेत.

महाराष्ट्रानंतर दिल्ली आणि कर्नाटकमध्ये सर्वात जास्त श्रीमंत लोक राहतात. दिल्लीत 185, तर कर्नाटकात 94 श्रीमंत आहेत. याशिवाय, सर्वाधिक श्रीमंत असलेल्या शहरांच्या यादीत पुण्याने पहिल्या 10 मध्ये स्थान पटकावले असून 8 व्या क्रमांकावर आहे. पुण्यात 34 श्रीमंत राहतात. गेल्या वर्षीपेक्षा 3 जणांची यादीत भर पडली आहे. सायरस पूनावाला हे पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

देशातील शहरांचा विचार करायचा झाल्यासही अतिश्रीमंतांची मुंबईला पहिली पसंती आहे. एकट्या मुंबईत 283 श्रीमंत राहतात. गेल्या वर्षीपेक्षा यात 28 जणांची वाढ झाली. 2018 मध्ये हाच आकडा 233 होता. मुंबईनंतर या यादीत नवी दिल्ली आणि बंगळुरूचा क्रमांक येतो. दोन्ही शहरांमध्ये अनुक्रमे 185 आणि 89 श्रीमंत राहतात. मुकेश अंबानी मुंबईतील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

Avatar

RENUKA KINHEKAR

All Posts

Latest News

Related Post

गौतम अदानी हे जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती

September 16th, 2022 | RENUKA KINHEKAR

नागपूर: भारतीय उद्योगपती गौतम अदानी हे जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. जगातील टॉप-१० अब्जाधीशांच्या यादीत इ...

राज्यात असंघटित वाहनचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थाप...

October 21st, 2021 | RAHUL PATIL

राज्यातील ऑटोरिक्षा चालक, टॅक्सी चालक, ट्रक चालक यासारख्या असंघटित वाहनचालकांच्या हितासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास ...

षडयंत्र हीच काँग्रेस पक्षाची ओळख :पंतप्रधान नरेंद्र ...

February 10th, 2022 | RENUKA KINHEKAR

नागपूर: काँग्रेस सत्तेवर असली की भ्रष्टाचार आणि विरोधात बसली की षडयंत्र हीच त्या पक्षाची ओळख आहे, अशी घणाघाती टीका पंतप्रध...