1. Coronavirus pandemic live updates: India reports a single-day rise of 253 new Covid cases in India 2. ‘I carry India with me wherever I go’: Google and Alphabet CEO Sundar Pichai 3. Aaftab used Chinese knife to dismember Shraddha's body, chopped her 1. कोरोनाव्हायरस (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला लाइव्ह अपडेट्स: भारतात एकाच दिवसात 253 नवीन कोविड प्रकरणांची नोंद झाली आहे 2. ‘मी जिथे जातो तिथे भारताला माझ्यासोबत घेऊन जातो’: गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई 3. श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी आफताबने चायनीज चाकू वापरला, आधी तिचे हात कापले: सूत्र

मै द्रौपदी मुर्मू….. देशाच्या १५ व्या राष्ट्रपतींनी घेतली शपथ!

Draupadi Murmu-thefreemedia
Mai Draupadi Murmu….. 15th President of the country took oath!

नवी दिल्ली: द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या १५व्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकून इतिहास रचला आहे. त्या देशातील आदिवासी समाजातील पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. त्यानंतर आज, २५ जुलै रोजी सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी द्रौपदी मुर्मू यांनी शपथ ग्रहण केली. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी शपथ दिली

मावळते राष्ट्रपती राम नाथ कोविंद आणि नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनातून संसद भवनापर्यंत मार्गक्रमण केले. शपथविधीच्या वेळी मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री, खासदार आदी उपस्थित होते. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आणि राज्यपालांना या सोहळ्यासाठी बोलावण्यात आले होते.

देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर विराजमान होणाऱ्या द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातील पहिल्या नागरिक ठरल्या आहेत. राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलैला झालेली निवडणूक एकतर्फी ठरली होती. या निवडणुकीत मुर्मू यांना ६४ टक्के, तर प्रतिस्पर्धी यशवंत सिन्हा यांना ३६ टक्के मते मिळाली होती. या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांनी विरोधी गटाचे यशवंत सिन्हा यांना पराभूत केले होते.

Avatar

RAHUL PATIL

All Posts

Latest News

Related Post

युक्रेनमधील वाढत्या तणावामूळे भारतीय विद्यार्थी परतले

February 23rd, 2022 | RENUKA KINHEKAR

नागपूर:रशिया-युक्रेनमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, एअर इंडियाचे विशेष विमान AI-1947 युक्रेनमधून भारतीयांना परत आ...

राष्ट्रीय एकात्मता गीत ‘प्यारा जम्मू काश्मीर&#...

January 31st, 2022 | RAHUL PATIL

भारतीय लष्कराच्या उत्तर कमांडने आज एक गाणे लाँच केले आहे. या गाण्यात जम्मू-काश्मीरचे नैसर्गिक सौंदर्य अधोरेखित करण्यात आले...

लष्करातील ३९ महिलांना सर्वाच्च न्यायालयाचा दिलासा; म...

October 22nd, 2021 | RAHUL PATIL

लष्करातील ३९ महिला अधिकाऱ्यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. या महिला अधिकाऱ्यांना एका आठवड्याच्या आत ...