नागपूर: महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपूर शहारातर्फे दि.२२ फेब्रुवारी ला प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी व शहर अध्यक्ष विशाल बडगे यांच्या नेतृत्वात दि. २७/२/२०२२ या दिनी येणाऱ्या थोर कवी ” कुसुमाग्रज ” यांचा जन्मदिवस “तसेच मराठी भाषा गौरव दिवस या दिवसाचे औचित्य साधून मराठी भाषेत दुकानांचे फलक करण्यात यावे करीता निवेदन देण्यात आले.
पूर्व विभाग येथील ३१७ दुकाने, दक्षिण विभाग येथील २२० दुकाने तसेच मध्य विभाग येथील २९८ दुकाने यांना निवेदना द्वारे सूचना देण्यात आल्या की आपल्या महाराष्ट्रात मराठीत फलक असणे गरजेचे असतांना आपणाकडून मराठी भाषेला दुय्यम स्थान देण्यात येत आहे. हे या नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापी सहन करणार नाही. शासनाचा मुंबई दुकाने व संस्था अधिनियम १९४८ कलम २० ‘अ’तसेच महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नौकरीचे व सेवाशर्थीचे विनिमय) अधिनियम, २०१७ या मध्ये सुधारणा करून महाराष्ट्र सरकार यांनी सुद्धा मंत्रिमंडळ बैठकीत दुकाने व आस्थापनांवरील पाट्या मराठी भाषेत कराव्या व तेही इतर भाषे पेक्षा मोठी असावी. यांकरिता मंजुरी दिलेली आहे.
तसेच अनेक वेळा आपल्याला आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या पाट्या मराठी भाषेत कराव्या करिता सूचना दिल्या.परंतु आपण आपल्या दुकांनावरील पाट्या आजपर्यत मराठीत केलेल्या नाहीत. जर का आपण ५ दिवसाच्या आत आपल्या दुकानावरील पाट्या मराठीत केल्या नाहीत तर २६ फेब्रुवारी २०२२ नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोषाला सामोरी जावे लागेल. असे निवेदनात सांगितले. त्याच प्रमाणे मा.अप्पर कामगार आयुक्त श्री. पाटणकर साहेब यांना सुद्धा निवेदन देऊन आपण कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थित न-करू शकल्यामुळे मराठी भाषेला दुय्यम स्थान काही दुकाने देत आहेत. असे स्पष्ट करण्यात आले.
त्यावेळी त्यांनी आजच सुचनेद्वारे व परिपत्रकाद्वारे नागपूर शहरातील समस्त दुकाने व आस्थापना यांना नोटीस काढून मराठी भाषेत पाट्या लिहण्याबाबत सूचना करतो व न केल्यास कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी वेळी उपशहर अध्यक्ष प्रशांत निकम, शहर सचिव घनश्याम निखाडे, पूर्व विभाग अध्यक्ष उमेश उतखेडे, मध्य विभाग अध्यक्ष शशांक गिरडे, दक्षिण विभाग अध्यक्ष गौरव पुरी, लोकेश कामडी, अंकित झाडे, शुभम पिंपळापुरे, निमेश पाटणकर,अमोल राऊत, स्वप्नील पाटणकर, आशिष पांढरे, मनोज गुप्ता, विभाग उपाध्यक्ष नितिन टाकळीकर, अण्णा उर्फ धीरज गजभिये, लेखराज पराते, गोकुल वव्हेकर, प्रज्वल देशमुख, लीलाधर मेंढे कार्तिक डाहे, शंकर धापोडकर, साहिल डाहे, आशिष कटू काळे, आकाश कुंभलकर, प्रफुल कटू काळे, अजय मारोडे, प्रदीप चुटे, निखिल जागडे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.