1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

मनसुख हिरेनच्या खुनाची ‘सुपारी’ घेतली होती; एनकाउन्टर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मानी

pradeep sharma
Spread the love

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवल्याच्या प्रकरणात मुख्य आरोपी व बडतर्फ सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे विरोधात आरोपपत्र दाखल केल्यानंतर याप्रकरणातील आणखी माहिती समोर येत आहे. मनसुख हिरेनला संपवण्याचा कट रचल्याचा खुलासा आरोपपत्रातून झाला आहे. माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना मनसुख हिरेनचा खून करण्याचे काम देण्यात आले होते. ३ सप्टेंबर रोजी एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात सचिन वाझेने प्रदीप शर्माला खुनासाठी (सुपारी) मोठी रक्कम दिल्याचे म्हटले आहे.

प्रदीप शर्माने मनसुख हिरेनची हत्या करण्याचे काम घेतल्यानंतर संतोष शेलारशी बोलून त्याला खुनात सामील होण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी मिळून हिरेनचा खून केला. मनसुख हिरेनचा खून ४ मार्च रोजी झाला आणि २ मार्च रोजी हे सर्व एकत्र भेटले होते. आरोपपत्रात उघड झाले की वाझेने २ मार्च रोजी एक बैठक बोलवली होती. ज्यामध्ये सुनील माने आणि दुसरा पोलीस कर्मचारी प्रदीप शर्मा दोघेही उपस्थित होते. आधीच मनसुख हिरेन तिथे होता.

वाझेने ही बैठक एनआयएच्या म्हणण्यानुसार, दोघांना हिरेन कसा दिसतो हे जाणून घेण्यासाठी आणि योजनेत कोणतीही अडचण येऊ नये म्हणून बोलावली होती. सचिन वाझे त्याच दिवशी संध्याकाळी पुन्हा एकदा अंधेरीच्या चकला येथे सुनील माने यांना भेटले आणि त्यांना बुकी नरेश गौर यांनी दिलेले सिम कार्ड आणि मोबाईल हँडसेट दिले.

Claim Free Bets

प्रदीप शर्माला मनसुख हिरेनच्या हत्येचे काम देण्यात आल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. या कामासाठी प्रदीप शर्माने संतोष शेलारशी संपर्क साधला आणि पैशाच्या बदल्यात खून करू शकतो का, असे विचारले होते. तेव्हा शेलारने हो म्हटले होते.

संतोष शेलारकडे तवेरा गाडीचा नोंदणी क्रमांक प्रदीप शर्माने मागितला, जी गाडी मनसुख हत्येसाठी वापरली जाणार होती. सचिन वाझेने सुनील माने यांना दिलेल्या सिमकार्डमध्ये काही समस्या होती. त्यामुळे सुनील माने ३ मार्च रोजी सचिन वाझेच्या कार्यालयात गेले आणि दिलेल्या सिमकार्ड मोबाईल फोन परत केला. त्यानंतर वाझे त्याच दिवशी पुन्हा मानेला चकला येथे भेटले. एक नवीन मोबाईल आणि सिम दिले आणि सांगितले की तावडेचे नाव घेऊन मनसुखला फोन करा आणि त्याला ठाण्यात यायला सांगा. तेथे मनसुखला संतोष शेलारकडे सोपवले जाईल.

मानेने ४ मार्च रोजी संध्याकाळी मालाड येथील पोलीस अधिकारी असल्याचे भासवत हिरेनला फोन केला. यानंतर हिरेन त्याला भेटायला तयार झाला. मनसुखला मानेने शेलाकडे सोपवले. शेलार मनीष सोनी, सतीश मोथुकरी आणि आनंद जाधव या तिघांसह तवेरा गाडीच त्यांची वाट पाहत होते. या लोकांनी हिरेनला गाडीमध्येच ठार केले आणि मृतदेह खाडीत फेकून दिला.

आरोपपत्रात पुढे असे म्हटले आहे की वाझे ३ मार्च रोजी पुन्हा एकदा शर्माला भेटले आणि त्यांना पैशांनी भरलेली बॅग दिली, ज्यात ५०० रुपयांच्या नोटा होत्या. प्रदीप शर्माने पैसे घेतल्यानंतर शेलारला फोन करून लाल तवेराची व्यवस्था करण्यास सांगितले. हिरेनला मारण्यासाठी आणि त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी शर्माला या वाहनाचा वापर करायचा होता.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    आर्यन खानचा मुक्काम 20 पर्यंत तुरुगांतच

    October 14th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveजामीनासाठी नेमलेले शाहरूखचे दोन्ही वकील अपयशी २ऑक्टोबरला मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझवरच्या एका पा...

    मुख्यमंत्र्याशी आज भेटणार शरद पवार; ईडी चौकशीच्या मु...

    September 9th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यातील महाविकास आघाडी सरकारचे जनक शरद पवार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्र्या...

    परिवहन मंत्री अनिल परब गोत्यात; अडचणीत वाढ

    September 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी पोलिसांना केलेल्या फोनचा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या प्रकारानंत...