संचारबंदी मध्ये मिळाली शिथिलता
अमरावती मध्ये 12 आणि 13 तारखेला झालेल्या हिंसाचारानंतर संपूर्ण शहरांमध्ये संचार बंदीचे आदेश पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी दिले होते, मात्र आता आठ दिवसानंतर या संचारबंदी मध्ये काही प्रमाणात शिथिलता मिळाली असून सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत संपूर्ण बाजारपेठ उघडण्यासाठी मुभा दिली आहे.
संपूर्ण शहरातील इंटरनेट सेवा सुद्धा सुरू झाली आहे, या आठ दिवसात आठशे ते हजार कोटीच्यावर शहरातील व्यापाऱ्यांचे नुकसान झाले असून आता शहरातील परिस्थिती पूर्ववत येत असली तरी सायंकाळी सहा ते दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजेपर्यंत शहरात संचारबंदी कायम राहणार आहे .