वर्धा/समुद्रपूर/सायगव्हाण: जिल्हा परीषद वर्धा आरोग्य विभागातर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र गिरड अंतर्गत पिंपळगाव उपकेंद्राच्या सौजन्याने ‘सायगव्हाण’ येथील आंगणवाडीत कोव्हीशिल्ड लसीकरणाच्या दुस-या डोसचे भव्य आयोजन करण्यात आले.
सायगव्हाण येथील महिला व पुरुषांनी लसीकरण मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद देत, दुसरा डोस घेतला. या लसीकरण मोहिमेत आज एकूण २८ नागरिकांनी दुसरा डोस घेतला असून त्यात १६ पुरूष व १२ महिलांचा समावेश आहे.
प्राथमिक केंद्र गिरड अंतर्गत पिंपळगाव उपकेंद्राच्या वतीने आरोग्य सेवक युवराज मेश्राम व आरोग्य सेविका भारती मून यांनी नागिकांना कोव्हीशिल्डचा दुसरा डोस दिला. लसिकरण मोहिमेत अंगणवाडी सेविका चित्राताई सोनवणे व सहशिक्षक रामराव मेहेत्री यांनी सहकार्य केले. याप्रसंगी गावातील नागरिक प्रमोद सोनवणे, कुणाल पावडे, गीताबाई मसराम, मनीषा वानकर, संगीता मसराम, गजानन उईके, अमोल उईके यांनी लसीकरणाचा लाभ घेतला.
याप्रसंगी आरोग्य सेवक युवराज मेश्राम यांनी सांगितले की, सायगव्हाण परिसरातील दुसरा डोस घेणा-या ९५% नागरिकांचे लसीकरण झाले असून, लवकरच पहिल्या डोजचा कालावधी संपलेल्यांना दुसरा डोस देण्यात येणार असून नागरिकांनी काळजी करण्याची गरज नाही. आरोग्य विभागाला सहकार्य केल्याबद्दल आरोग्य सेवक व सेविका यांनी नागरीकांचे आभार मानले.