1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

यंदाच्या सीईटी परीक्षांच्या रजिस्ट्रेशनसाठी 11 मे पर्यंत मुदतवाढ

exams-thefreemedia
Spread the love

महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (Maharashtra Common Entrance Test Cell) कडून काही दिवसांपूर्वीच MHT CET 2022 परीक्षेसाठी रजिस्ट्रेशनच्या कालमर्यादेमध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. आता विद्यार्थी 11 मे पर्यंत परिक्षेसाठी अर्ज करू शकणार आहेत. यामध्ये 5 सीईटी परीक्षांचा समावेश असणार आहे. यंदा MHT CET Exams 2022 (MHT-CET 2022, MAH MBA/MMS CET 2022, MAH MCA CET 2022, MAH M-ARC CET 2022 and MAH M-HMCT) या परीक्षा देणार्‍यांसाठी ही मुदतवाढ लागू असणार आहे.

पोस्ट ग्रॅज्युएट टेक्निकल कोर्स मधील या 5 सीईटी परीक्षांसाठी cetcell.mahacet.org या महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा कक्षांच्या अधिकृत वेबसाईट वर रजिस्ट्रेशन करता येणार आहे. दरम्यान विद्यार्थी, पालकांकडून सातत्याने मुदतवाढ द्यावी यासाठी मागणी करत होते त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे नोटिफिकेशन मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

सीईटी परीक्षेसाठी कसं कराल ऑनलाईन रजिस्ट्रेशन?

cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
MHT CET 2022, MAH MBA/MMS CET 2022, MAH MCA CET 2022, MAH M-ARC CET 2022 and MAH M-HMCT 2022 यापैकी तुम्ही ज्या सीईटीला सामोरं जात आहात त्याची निवड करा.
new registration वर क्लिक करा आणि तुमची माहिती भरा.
तुमचा फॉर्म भरल्यानंतर आवश्यक डॉक्युमेंट्सदेखील अपलोड करा.
अ‍ॅप्लिकेशन फी भरल्यानंतर तुमचा फॉर्म सबमीट करा.
त्यानंतर तुमचा फॉर्म प्रिंट आऊट काढण्यासाठी डाऊनलोड करू शकता.

यंदा JEE , NEET परीक्षेसोबत सीईटीच्या परीक्षा येत असल्याने सीईटीच्या परीक्षांमध्ये तारखांमध्ये बदल झाला आहे. या परीक्षांचेही सविस्तर वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. PCM ग्रुपची परीक्षा 05 ते 11 ऑगस्ट, 2022 आणि PCB ग्रुपची परीक्षा 12 ते 20 ऑगस्ट, 2022 दरम्यान होणार आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    आर्यनला जामीन तर मिळणार पण, न्यायालयाने ठेवल्या R...

    October 30th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveबॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान गेल्या अनेक दिवसापासून अं’मली पदार्थ प्रकरणात कोठडीत आहे. अशात...

    मुंबई दहशतवादी अटक प्रकरण पोलिस सक्षमपणे हाताळतील; ग...

    September 15th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदिल्ली पोलीसांच्या विशेष पथकाने ६ दहशतवाद्यांना अटक केली आहे. यातील २ दहशतवादी महाराष्ट्राचे असून त्यातला ए...

    ‘शिवसेनेला मोठा झटका’, ‘या’ ...

    September 22nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveपिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यावर आली आहे. सध्या महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. ...