जागतिक आरोग्याच्या अभ्यासानुसार, १५ ते ४९ वयोगटामधील मृत्यूच्या कारणांमध्ये दारूचे सेवन हे एक प्रमुख कारण आहे. याच अभ्यासानुसार १५ – ४९ वयोगटातील १२% मृत्यू दारूच्या सेवनामुळे होतात. ही बाब अतिशय धक्कादायक आणि लक्ष देण्याजोगी आहे. त्यामुळेच वाढत चाललेल्या दारूच्या सवयींना थांबवणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, अशी माहिती डॉ. धारव शहा यांनी द फ्री मीडियाला दिली.
दारूच्या या महामारीची जाणीव करून देणे व याबाबतच्या उत्तरांची चर्चा करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने ‘मेरी प्यारी जिंदगी’ नावाने सोशल मीडियावर चळवळ सुरु केलेली आहे. याअंतर्गत पुढील काही काळामध्ये श्रवणीय अशा ऑडिओ कथा व व्हिडीओ कथा प्रकाशित करण्यात येणार आहेत. लोकांकडून सांगण्यात आलेल्या या कथांमुळे तरुणाईचा दारूकडे बघण्याच्या दृष्टिकोन बदलायला नक्कीच मदत होईल. या बदलाच्या प्रक्रियेमध्ये योगदान खूपच महत्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
उदाहरणार्थ :- दारूची सामाजिक मान्यता कमी करण्यासाठी व दारूमुळे होणाऱ्या धोक्यांची जाणीव करून देण्यासाठी जगातील आरोग्य संघटनेने राबविलेली चळवळ ‘मेरी प्यारी जिंदगी’. या अंतर्गत कॉलेजमध्ये नव्याने दाखल झालेल्या मुलीची कथा.
सक्रियपणे या कॅम्पेनमध्ये सहभागी होण्यासाठी पुढील गोष्टी करू शकता:-
१. 8149363854 या क्रमांकावर तुमचे नाव आणि पत्ता पाठवा, नंतर तुम्हाला नियमित माहिती पाठवणियात येईल. तसेच या चळवळीत सहभागी करून घेतल्या जाईल.
२. फेसबुक लिंक: https://www.facebook.com/PoisonsWeLove
३. टेलिग्राम लिंक: https://t.me/poisonswelove
अधिक माहितीसाठी वेबसाईट: https://www.poisonswelove.org/