महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा हा मिनी यूपीएचा प्रयोग आहे, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना यूपीएमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
यावर राऊतांनी ६ डिसेंबर पत्रकार परिषद चर्चेला पूर्णविराम लावला आहे. राऊत हे आज काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. शिवसेना यूपीएमध्ये जाणार या चर्चा केवळ माध्यमांमध्ये आहे.आम्ही या सर्व गोष्टी वृत्तपत्रातून वाचतो आणि ऐकतो, असे राऊत म्हणाले.
शिवसेनात यूपीएचा भाग होणार नाही, असा प्रश्न पत्रकारांनी विचारले असता, शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, ‘हा प्रश्न तुम्ही आता कशा करत विचारता.
यासंदर्भात शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे योग्य वेळी निर्णय घेतील. आम्ही कोणाचा भाग बनायचा आणि कोणत्याही भागाशिवाय आम्ही तीन पक्ष महाराष्ट्रविकास आघाडी म्हणून राज्याच्या सत्तेमध्ये आहोत आणि यूपीएमध्ये काय असते शेवटी भिन्न विचारचे पक्ष एकत्र येतात. सत्ता स्थापन करतात आणि समान कार्यक्रमावर आपली सरकार चालवितात. यूपीए सुद्धा त्याच पद्धतीने चालत. वाजपेयीच्या नेतृत्त्वाखाली देखील एनडीएमध्ये सुद्धा अनेक विचारधारेचे पक्ष होते.
यात राम मंदिराला विरोध करणारे पक्ष देखील होतात. त्यानंतरच्या एनडीएमध्ये सुद्धा तसेच पक्ष होते. महाराष्ट्रात प्रयोग सुरु आहे, तो मिनी युपीएचा प्रयोग आहे. युपीए किंवा विरोधी पक्षांची आघाडी आहे, त्यांनी अधिक मजबुतीने पुढे यावे. त्यात जास्तीत-जास्त पक्षांनी एकत्र यायला पाहिजे आणि पर्याय उभा केला पाहिजे, ही उद्धव ठाकरेंसोबत शरद पवारांचीही भूमिका आहे.
‘राहुल गांधी यांनी मी आज नक्कीच भेटणार आहे, त्याला तुम्ही कर्टसी व्हिजिट का म्हणत नाही. आम्ही एकमेकांसोबत संवाद ठेवत असतो. शिवसेना हा महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षसोबत सत्तेमध्ये सहभागी झालेला पक्ष आहे. एकमेकांच्या मदतीने समान नागरी कार्यक्रमावर आम्ही सरकार चालवितो. सरकार उत्तम चालले आहे आणि तिन्ही पक्षामध्ये संवाद असावा, असे आम्हाला वाटते. त्यामुळे मी जेव्हा दिल्लीत असतो, तेव्हा मी त्यांना भेटतो, असेही ते पुढे म्हणाले.