शेतकऱ्यांना ऊसाची एफआरपी एक रकमी मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. शेट्टी यांनी एफआरपीसाठी येत्या 7 ऑक्टोबरपासून राज्यात ‘जागर एफआरपी’चा हे आंदोलन छेडणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच आमचा दसरा कडवट झाला तर राज्यातील एकाही मंत्र्याची दिवाळी गोड होऊ देणार नाही, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला. यावेळी त्यांनी एफआरपीच्या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली.
राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नव्या आंदोलनाची घोषणा केली. येत्या 7 ऑक्टोबरपासून राज्यात जागर एफआरपीचा हे आंदोलन छेडण्यात येईल. आराधना शक्तिस्थळापासून हे आंदोलन सुरू करू, असं शेट्टी यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी पूर परिस्थितीवरूनही राज्य सरकारवर टीका केली. पूरग्रस्तांना अद्यापही मदत करण्यात आली नाही. आमचा दुसरा कडवट झाला तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला दिला.