आमदार रवी राणा हे नेहमीच चर्चेत राहतात. त्यांच्या अडचणीत वाढ असल्याचे वृत्त मिळाले आहे.त्यांच्या विरोधात सुनील भालेराव आणि सुनील खराटे यांनी राणा यांच्या वर विधानसभा निवडणुकीत मर्यादेपेक्षा अतिरिक्त रुपये खर्च करण्याचा आरोप लावून याचिका दाखल केली होती.
आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांच्या विरोधात दाखल केलेल्या सुनवाई केल्यावर त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. याचिकेवर सुनवाई करताना न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली असून त्यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. राणा यांच्या वर विधानसभा निवडणुकीत मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्या प्रकरणी लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम 10 ए अंतर्गत कारवाई करण्याची नोटीस न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिली आहे.त्यामुळे राणा यांची आमदारकी धोक्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.