1. Doha bound IndiGo flight diverted to Pakistan's Karachi due to a medical emergency onboard. 2. 'Naatu Naatu' from RRR wins the Oscar for the Best Original Song. 3. India's 'The Elephant Whisperers' wins Oscar award for the Best Documentary Short 1. मुंबई : कमला नगरमधील झोपडपट्टीत लागली भीषण आग.  2. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर 'फीडबॅक युनिट' या कथित स्नूपिंग प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत खटला चालवण्यास गृह मंत्रालयाने दिली मंजुरी. 3. हरित ऊर्जेला मुख्य प्राधान्य देण्याच्या भारत सरकारच्या निर्णयामुळे खुश आहे: डेन्मार्कचे एन्व्हॉय.

MLC election 2023: उपमुख्यमंत्री फडणवीस  यांनी अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांचे केले अभिनंदन                                                                                                          

MLC-Elections

नागपूर :राज्यात झालेल्या विधान परिषद निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसल्याचे स्पष्ट कबुली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी दिली. काही ठिकाणी अपेक्षेप्रमाणे काम झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांचे अभिनंदन केले. अपक्ष म्हणून निवडणूक लढताना एवढा मोठा विजय मिळवणे सोपं नसल्याचेही सांगत फडणवीस यांनी तांबे यांचे कौतुक केले.

आज मुंबईत भाजपची कोअर समितीची बैठक पार पडली. या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद निवडणुकीवर भाष्य केले. फडणवीस यांनी म्हटले की, आज झालेल्या मतमोजणीत आम्ही कोकणमधील जागा बऱ्याच कालावधी नंतर जिंकलो आहोत. नागपूरमध्ये शिक्षक परिषदेने आग्रह केला आणि निवडणूक लढवली. आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता. नागपूरची जागा शिक्षक परिषदेला हवी असल्यानं ती आम्हाला लढवता आली नाही, ती जागा जिंकलो नाही याचं दुःख आहे, असेही त्यांनी सांगितले. अमरावतीमध्ये मात्र, अपेक्षित मते मिळाली नसल्याची कबुली त्यांनी दिली. अमरावतीमध्ये मतांचा कोटा कोणत्याच उमेदवाराने पूर्ण केला नाही. मात्र, आम्हाला अपेक्षे इतकी मते मिळाली नसल्याची कबुली त्यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजीत तांबे यांचे अभिनंदन करताना कौतुक केले. महाविकास आघाडीने सत्यजीत तांबे यांना लक्ष्य करत त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली. मात्र, सत्यजीत तांबे यांनी , तीन पक्ष एकत्र येऊनही त्यांच्याविरोधात विजय मिळवला. निवडणूक अपक्ष लढवून जिंकल्याबद्दल सत्यजित तांबेंचं मनापासून अभिनंदन करत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजित तांबे विजयी झाले आहेत. सत्यजित तांबे यांना पाचव्या फेरी अखेर 68 हजार 999 मते मिळाली. तर महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या उमेदवार शुभांगी पाटील यांना 39 हजार 534 मते मिळाली. अपक्ष उमेदवार असलेले सत्यजित तांबे तब्बल 29 हजार 465 इतक्या मताधिक्याने विजयी झाले.

RENUKA KINHEKAR

RENUKA KINHEKAR

All Posts

Latest News

“Cloud & Metaverse Summit 2023”; तं...

February 25th, 2023 International

Related Post

मोदींनी अडाणी अधिका-यांची भरती केली आहे का? सचिन सावंत

June 16th, 2022 | RAHUL PATIL

मुंबई: ईडी चौकशीचा नॅशनल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सलग चौथ्या दिवशी शुक्रवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी ...

दिलासादायक: देशात बाधितांपेक्षा बरे होणारे तिपटीने

February 15th, 2022 | RAHUL PATIL

देशात गेल्या २४ तासात बाधित होणाऱ्यांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या तिपटीने वाढली आहे. गेल्या २४ तासात २७ हजार ४०९...

गुजरातचे नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल; आज होणार शपथ...

September 13th, 2021 | RAHUL PATIL

गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी भूपेंद्र पटेल यांची निवड करण्यात आली आहे. विजय रुपाणी यांनी काल राजीनामा दिल्यानंतर नव्या विधीमं...