शिवसेनेचा सामन्यातून टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हॅटिकन सिटी येथे रोमन कॅथलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. मोदींनी पोप यांनी भेट दिलेल्या बायबलची प्रत मस्तकी लावली. त्यावरुन आता सामनातून मोदी आणि मोदी भक्तांवर टीका करण्यात आली आहे. दुसरे कोणी हे सद्सदविवेकबुद्धीने केले असते तर हाय तोबा तोबा! राष्ट्र, धर्म, संस्कार, भ्रष्टच झाला असता आणि शुद्धीकरण मोहिमा सुरु झाल्या असत्या. अंध भक्तांनी आता काय करावे, हे मोदींनाच ‘मन की बात’मधून सांगावे लागेल असे शिवसेनेने म्हंटल.
पंतप्रधान मोदी पोप यांना नुसतेच भेटले नाहीत तर पोप यांनी भेट दिलेल्या बायबलची प्रत मस्तकी लावली. मोदी यांनी आपल्या या कृतीतून स्वदेशातील मूलतत्त्ववाद्यांना कठोर संदेश दिला. मोदी हे अचानक नवाज मियाँना भेटतात, पोप महाराजांनाही भेटतात, हे सर्व मोदींना शोभते. दुसरे कोणी हे सद्सदविवेकबुद्धीने केले असते तर हाय तोबा तोबा! राष्ट्र, धर्म, संस्कार, भ्रष्टच झाला असता व शुद्धीकरण मोहिमा सुरू झाल्या असत्या. अंध भक्तांनी आता काय करावे, हे मोदींनाच ‘मन की बात’मधून सांगावे लागेल,” असा उपहासात्मक टोला लेखातून लगावण्यात आलाय.
मोदी आणि पोप यांच्यात गरिबी निर्मूलनावर चर्चा झालीच असेल तर आपल्या देशातील गरिबी निर्मूलनाबाबत पंतप्रधान मोदी यांनी पोपसाहेबांना नक्की कोणती माहिती दिली? मोदी आणि पोप यांच्यात चर्चा सुरु असतानाच इकडे ‘मनरेगा’ म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत आर्थिक खडखडाट झाल्याचे वृत्त समोर आले. योजनेसाठी असलेला पैसा संपला असून या योजनेवर काम करणाऱया मजुरांची दिवाळी अंधारातच जाणार, असे चित्र निर्माण झाले आहे. देशातील 21 राज्यांत ‘मनरेगा’चे काम चालत असते.