दिल्ली : भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) प्रवक्ते राकेश टिकैत हे गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांचे नेते म्हणून उदयास आले आहेत. राकेश टिकैत तीन कृषी कायद्यांविरोधात सतत चर्चेत राहिले. त्याचवेळी सोमवारी ‘पंचायत आज तक उत्तर प्रदेश’ या कार्यक्रमात राकेश टिकैत यांनी यूपीमधील आगामी विधानसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका मांडली.
या कार्यक्रमात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टिकैत यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांना योगी पुन्हा मुख्यमंत्री होतील का असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला खोचक पद्धतीने उत्तर देताना, “अरे त्यांना पंतप्रधान बनवा हरकत नाही. हे पंतप्रधान (नरेंद्र मोदी) कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच पद सोडतील आणि राष्ट्रपती बनतील. योगी नवे पंतप्रधान होतील. आपला (उत्तर) प्रदेश रिकामा होईल, येथे इतर कोणी तरी नेतृत्व करेल,” असं टिकैत यांनी म्हटलं.
टिकैत यांच्या या वक्तव्यावर प्रश्न विचारणारी महिला पत्रकार त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत राहिल्यावर टिकैत यांनी, “योगीजी पंतप्रधान होणे हे तुम्हाला योग्य वाटत नाही का?,” असा उलट प्रश्न विचारला. यावरुन सभागृहामध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर अँकरने मोदी राष्ट्रपती बननणार तर आताच्या राष्ट्रपतींचं काय?, असा प्रश्न टिकैत यांना विचारला. “ते किती माहिने आहेत?, काही महिने त्यांचा कार्यकाळ शिल्लक आहे,” असं उत्तर टिकैत यांनी दिलं.
राकेश टिकैत २०२२ च्या विधानसभा निवडणूक लढवण्याबद्दल म्हणाले, “आम्ही लढत नाही. आम्ही निवडणुका लढलो तर अँकर काय करतील? पक्ष बनवा, प्रेसचे लोक.” ते पुढे म्हणाले, “”ज्यांच्याकडे सध्याचे सरकार आहे, जनता त्यांना मतदान करणार नाही.