नवी दिल्ली: देशात शुक्रवारी कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली. 20 हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले असून 70 रुग्णांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सकाळी 8 वाजता जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 20,551 नवे बाधित आढळून आले आहेत. यादरम्यान 21595 लोकही बरे झाले.
गेल्या 24 तासांत 70 मृत्यूंची नोंद झाल्याने देशात महामारीमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 5,26,600 वर पोहोचली आहे, तर एकूण रुग्णांची संख्या 4,41,07,588 वर पोहोचली आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेटही वाढून 5.14 टक्के झाला आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1,35,364 इतके आहेत.
गुरुवारी 16 टक्के वाढ
गुरुवारी देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये सुमारे 16 टक्के वाढ झाली. काल, बुधवारी कोरोनाच्या 19,893 नवीन रुग्णांची नोंद झाली, तर 17,135 नवीन रुग्णांची नोंद झाली. शुक्रवारी यात आणखी वाढ होऊन 20 हजारांवर पोहोचले. गुरुवारी देशात 53 जणांचा संसर्गामुळे मृत्यू झाला, तर शुक्रवारी 70 जणांचा मृत्यू झाला. म्हणजेच शुक्रवारी संसर्ग आणि मृत्यू दोन्ही वाढले. मात्र, गुरुवारच्या तुलनेत अॅक्टिव्ह केस कमी झाल्या. गुरुवारी सक्रिय रुग्णांची संख्या 1,36,478 पर्यंत खाली आली होती, जी शुक्रवारी आणखी कमी होऊन 1,35,364 वर आली.