आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांच्या लेखी परीक्षेतील गोंधळामुळे अखेर ही परीक्षाच रद्द करण्यात आली आहे. यानंतर पुन्हा एकदा राज्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैली झडत आहेत. याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपेंवर निशाणा साधला. अहो आरोग्यमंत्री टोपे साहेब, वसुलीचा आकडा ठरला नसल्यामुळे परीक्षा रद्द झाली आहे का? असा खोचक सवाल त्यांनी केला आहे.
सदाभाऊ खोत यांनी ट्विट करत म्हंटल की, एक रात्री आधी असा काय शासनाला साक्षात्कार झाला की आरोग्य भरतीच्या परीक्षा रद्द करायचा चमत्कार करावा लागला. अहो आरोग्यमंत्री साहेब, वसुलीचा आकडा ठरला नसल्यामुळे परीक्षा रद्द झाली आहे का? महाभकास आघाडी अजून विद्यार्थ्यांसोबत किती छळ करणार?, असा सवाल खोत यांनी केला आहे.