नागपूर: उत्तरप्रदेश विधानसभा २०२२ निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाने सपा संरक्षक मुलायम सिंह यादव यांच्या कुटुंबात मोठी खळबळ उडवून दिली आहे. मुलायम सिंह यादव यांची सून अपर्णा यादव यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला.
यूपी भाजपचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंग, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि पक्षाच्या मीडिया विभागाचे प्रभारी अनिल बलूनी यांच्या उपस्थितीत त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
अपर्णा यादव या मुलायम सिंह यादव यांचा धाकटा मुलगा आणि सपा प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान भाऊ प्रतीक यादव यांच्या पत्नी आहेत. भाजपने अपर्णा यादव यांचे पक्षात येण्याचे स्वागत केले आहे.
भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अर्पणा यादव म्हणाल्या की, “मला नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रेरणा मिळाली आहे. मला आता देशासाठी अधिक चांगले करायचे आहे. भाजपच्या योजनांनी मी नेहमीच प्रभावित झाली आहे. मी पक्षात सर्वोत्तम कामगिरी करेल.”
यूपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले, “आम्ही तुमचे भाजप परिवारात स्वागत करतो. आम्हाला सांगायला आनंद होत आहे की, मुलायम सिंह यादव यांची सून असूनही, त्यांनी (अपर्णा) अनेकदा भाजपच्या कामाचे कौतुक केले आहे.”
गेल्या काही दिवसांपासून अपर्णा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचीही चर्चा होती.
तिने अनेक प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले आहे.
मागास जातीतील अनेक नेत्यांनी पक्ष सोडल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये भाजपसाठी ही मोठी निवडणूक आहे. योगी मंत्रिमंडळातून राजीनामा दिलेल्या तीन मंत्र्यांनी नुकतेच सपामध्ये प्रवेश केला होता. “
अपर्णा यादव यांनी २०१७ ची निवडणूक लखनऊ कॅंट विधानसभेतून सपाच्या तिकिटावर लढवली होती, परंतु भाजपच्या रीटा बहुगुणा जोशीकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीनंतरही अपर्णा यादव भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर अपर्णा यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची दोनदा भेट घेतली होती.