1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

मुल्ला बरादर आणि हक्कानी आमने- सामने ! पाकमुळे तालिबान्यात फूट

mullah baradar
Spread the love

अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी तालिबानमध्ये अंतर्गत गटबाजी समोर येत आहे. यामध्ये तीन मुख्य नावे आहेत. मुल्ला अब्दुल गनी बरदार, हिबतुल्ला अखुंदजादा आणि सिराजुद्दीन हक्कानी. अहवालांनुसार, मुल्ला बरदार आणि सिराजुद्दीन हक्कानी यांच्यात सरकार स्थापनेवर संबंध ताणले गेले आहेत. याशिवाय काही कारणे आहेत ज्यामुळे अफगाणिस्तानमध्ये सरकार बनवण्यात तालिबान्यांना अडथळे येत आहेत.

1994 मध्ये तालिबानची स्थापना करणाऱ्या चार लोकांमध्ये मुल्ला अब्दुल गनी बरदार यांचेही नाव होते. 2001 मध्ये, जेव्हा अमेरिकेने अफगाणिस्तानात तालिबानला सत्तेतून बेदखल केले, तेव्हा मुल्ला बरादर बंडखोरीच्या विरोधात एक महत्त्वाचा चेहरा बनला. बरदार यांच्याबद्दल असे सांगितले जात आहे की अल्पसंख्याकांशी संबंधित घटकांना सरकारमध्ये समाविष्ट करायचे आहे. मात्र, हक्कानी नेटवर्कचे नेते सिराजुद्दीन हक्कानी यांना कोणासोबतही सत्तेची भागीदारी करायची नाही. हक्कानी नेटवर्क, तालिबानसोबत असूनही, अफगाणिस्तानमध्ये एक शक्तिशाली गट म्हणून उदयास येत आहे. अहवालांनुसार, हक्कानी नेटवर्कला पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचाही पाठिंबा आहे.

आयएसआयचे महासंचालक लेफ्टनंट जनरल फैज हमीद हे तालिबानचे समर्थक मानले जातात आणि त्यांनी अलीकडेच काबूलला जाऊन हक्कानी नेटवर्कशी भेट घेतली होती. या बैठकीनंतर अफगाणिस्तानच्या कारभारात पाकिस्तानच्या हस्तक्षेपामुळे अफगाण लोकांनी अनेक ठिकाणी निषेध नोंदवला होता. आयएसआयने यापूर्वी काबुलमधील भारतीय दूतावासाला लक्ष्य करण्यासाठी हक्कानी नेटवर्कचा वापर केला आहे. अहवालांनुसार, जनरल हमीद अहमद मसूद आणि अमरुल्लाह सालेह यांनी तयार केलेल्या पंजशीर सेनानी विरोधात तालिबानच्या कारवायांच्या हालचालींवर देखरेख करण्यासाठी गेला होता.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    रोमच्या ट्रेवी फौंटनमध्ये मोदींसह अन्य देश प्रमुखां...

    November 1st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी २० शिखर परिषदेत सामील होण्यासाठी इटली दौ-यावर गेले आहेत. रविवारी मोदी यां...

    फायझर लसीच्या वापराला सरकारची परवानगी

    October 30th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveअमेरिकेत लहान मुलांच्या लसीकरणाला हिरवा झेंडा शुक्रवारी अमेरिकेने फायझर या करोना प्रतिबंधक लसीच्या लहान मुल...

    तालिबान पाकिस्तानवर नाराज मात्र भारताचे कौतुक

    March 5th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveअफगाणिस्तानमध्ये सत्तेत आलेल्या तालिबान सरकारने भारताचे कौतुक केले आहे तर पाकिस्तानवर मात्र नाराजी व्यक्त क...