अफगाणिस्तानमध्ये मुल्ला मोहम्मद हसन अखुंदजादा यांच्या नेतृत्वाखाली तालिबानचं सरकार स्थापन झालं. अफगाणिस्तानचे पंतप्रधान हे मुल्ला मोहम्मद हसन अखूंद हे असणार आहेत. तालिबानचा नंबर दोनचे नेते म्हणून मुल्ला गनी बरादर उप पंतप्रधानांच्या भूमिकेत असतील. बरदार यांच्यासह मुल्ला अब्दास सलाम यांनाही मोहम्मद हसन अखुंद यांची उपपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तालिबानच्या प्रवक्त्यानं मंत्रिमंडळाची घोषणा पत्रकार परिषदेत केली. मंगळवारी तालिबानचे प्रवक्ते जबीउल्ला मुजाहिद यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, मुल्ला मोहम्मद हसन अखुंदजादा सरकारचे पंतप्रधान असतील आणि मुल्ला अब्दुल गनी बरदार सरकारचे उप पंतप्रधान असतील.
1999 कंधार हायजँकचा मास्टरमाईंड मुल्ला अकबरचा मुलगा अफगाणिस्तानचा संंरक्षणमंत्री
मुल्ला याकूब संरक्षण मंत्री आणि सिराजुद्दीन हक्कानी हे गृहमंत्री असतील.
कसं असेल तालिबानचं नवं मंत्रिमंडळ
पंतप्रधान- मुल्ला मोहम्मद हसन अखुंद
उपपंतप्रधान (1)- मुल्ला गनी बरादार
उपपंतप्रधान (2)- मुल्ला अब्दास सलाम
गृहमंत्री- सिराजुद्दीन हक्कानी
संरक्षण मंत्री- मुल्ला याकूब
माहिती मंत्री- खैरुल्लाह खैरख्वा
माहिती मंत्रालयातील उपमंत्री- जबिउल्लाह मुजाहिद
उप परराष्ट्र मंत्री- शेर अब्बास स्टानिकजई
न्याय मंत्रालय- अब्दुल हकीम
अर्थमंत्री- हेदयातुल्लाह बद्री
मिनिस्टर ऑफ इकोनॉमी- कारी दीन हनीफ
शिक्षण मंत्री- शेख नूरुल्लाह
हज आणि धार्मिकसंबंधी मंत्री – नूर मोहम्मद साकीब
आदिवासी व्यवहार मंत्री- नूरुल्लाह नूरी
ग्रामीण पुनर्वसन आणि विकास मंत्री- मोहम्मद युनूस अखुंदजादा
सार्वजनिक बांधकाम मंत्री- अब्दुल मनन ओमारी
पेट्रोलियम मंत्री- मोहम्मद एस्सा अखुंद