भावी डॉक्टराची निर्घृण हत्या
यवतमाळ येथील श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयातील एम बी बी एस च्या अंतिम वर्षाला असलेल्या डॉ अशोक पाल याची काल रात्री ८.०० च्या सुमारास वाचनालयातून वसतीगृहात परत येत असतांना अज्ञात मारेक-यांनी चाकूने वार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली.
भावी डॉक्टर च्या हत्येने परीसरात एकच खळबळ उडाली असून डॉक्टर विद्यार्थांनी न्यायासाठी संप पुकारला असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून समजते. पोलीसांशी यासंदर्भात संपर्क साधला असता खुन्याचा शोध लागला नसून तपास सुरु असल्याचे सांगितले. खुनामागील कारण अद्यापही समजू शकले नाही.
तेथील डॉक्टर विद्यार्थीशी ‘फ्री मिडीया’ने संपर्क साधला असता, सत्य माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेततेबाबत अनेकदा महाविद्यालय प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही प्रशासनातर्फे दुर्लक्ष होत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. महाविद्यालय , वसतीगृहात कोणत्याही प्रकारची सुरक्षा, सुविधा नसल्याने अनेकदा तक्रार व सूचना प्रशासनास केलेल्या असल्याचे डॉक्टर विद्यार्थ्यांनी सांगितले. डॉ अशोक पाल यांच्या हत्येने वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात असून, कोवीड कालावधीत अनेकांना सहकार्य करणा-या आमच्या डॉ अशोक पाल यांना योग्य न्याय मिळावा अशी मागणी तेथील डॉक्टरांनी केली आहे.