नागपूर: आज शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीचे सम्सन आले. त्यावेळी मीडियाशी बोलतांना संजय राऊत म्हणालेत की, जे कोणी सोडून गेले त्यांच्याशी लढा देण्यासाठी आमच्यासारख्या माणसाला मैदानात उतरावं लागतेय. त्यामुळे महाराष्ट्रद्रोही काही लोक एकत्र येऊन त्यांची वडोदराला जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये ठरल की संजय राऊत को टाइट करो. तेव्हाच मला माहिती आली की, ईडी मला समन्स पाठवून बोलावेल. पण माझी तयारी आहे, बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आणि महाराष्ट्रासाठी अशा प्रकारच्या कोणत्याही बनावट कारवाहीने माझी मान कापली तरी मी गुवाहाटीला जाणार नाही. मी गुढगे टेकणार नाही. मी तुरुंगात जाणे पसंत करेल. अजून जर त्यांना माझ्यावर कोणते खोटे खटले दाखल करायचे असतील, तरी तयार आहे मी शिवसेनेचा वाघ आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर ३० वर्ष काम केल. शिवसेनेचा नेता आहे मी. लढाऊ अशा सामनाचा संपादक आहे. माझ मनोधर्य ते खच्ची करू शकणार नाहीत. जिथे असेल तिथे शिवसेनेसाठी लढेल.
दिल्लीतून भारतीय जनता पक्ष नेत्यांचा आणि महाराष्ट्रातील नेत्यांचा आदेश असेल कि यांना (संजय राऊत) अटक करा आणि घेऊन जा तर ते अटक करू शकतात मला कधीही. घरी नोटीस आली असेल तर मी बघून घेणार. ज्या पद्धतीने राजकीय हालचाली मुबंईत/ महारष्ट्रात सुरु आहे त्यावरून मला नक्की माहिती होते कि मला थांबवायला, शिवसेनेला थांबवायला काही लोक एकत्र येतील आणि मला आणि माझ्या काही साथीदारांना त्रास देतील. पण मला कितीही त्रास द्या मला फाशीवर चढवून द्या, माझा गळा कापून टाका मी गुवाहाटीला जाणार नाही.
मी बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना आहे त्यांच्या सोबत उभा राहील आणि त्यांची साथ द्यायायला शेवटच्या श्वासापर्यंत
लढत राहील. याकरिता मला गोळी मारा किंवा जेलमध्ये टाका. उद्या नक्की मी ईडीच्या ऑफिसमध्ये जाणार आणि जी कायदेशीर प्रक्रिया आहे त्यांच्या समोर जाणार, मी पळणार नाही. जे गुवाहाटीला आहेत ते शरीराने तिकडे आहेत त्यांचा आत्मा मेला आहे आणि असे शरीर जेव्हा इथं येत तेव्हा ते निर्जीव आणि मृत असत असेही ते म्हणाले.