1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

नागपूर ठरतेय ‘क्राईम सिटी’; धक्कादायक बाब.!! माहितीच्या अधिकारातून उघड

Spread the love

राज्याच्या उपरिजधानीत मागील काही महिन्यांपासून महिला अत्याचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलेला असताना नागपुरातील महिलांसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये या वर्षी वाढ दिसून आली आहे. 2019 आणि 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये एकूण गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. विशेषत: महिला अत्याचारांचे वाढलेले प्रमाण चिंतेची बाब आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत दर महिन्याला शहरात 110 गुन्हे दाखल झाले आहेत. यात महिला अत्याचारांच्या गुन्ह्यांची संख्या महिन्याला 18 इतकी आहे. माहिती अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

माहिती अधिकारातून धक्कादायक माहिती उघड

नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती अधिकाराअंतर्गत नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे विचारणा केली होती. प्राप्त झालेल्या माहितीनुसार महिला अत्याचारांचे 2019 मध्ये 136 (दर महिन्याला 11), 2020 मध्ये 172 (दर महिन्याला 14) गुन्हे नोंदविले गेले. 2021 मध्ये ऑगस्ट महिन्यात 149 गुन्हे (दर महिन्याला 18) गुन्हे नोंदविण्यात आले

कोरोना काळात गुन्ह्यांमध्ये वाढ

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान लॉकडाऊनमध्ये लोक मोठ्या संख्येने घरात होते. त्यानंतरही या काळात नागपुरात महिला तस्करी, बलात्कार, बाललैंगिक यासह महिलांसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये वाढ झालीय. माहिती अधिकारातून सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी हे वास्तव पुढे आणलंय.

Claim Free Bets

नागपूर क्राईम सिटी?

नागपुरात २०१९ या वर्षाच्या तुलनेत लॅाकडाऊन असलेल्या २०२० आणि २०२१ च्या ऑगस्ट महिन्यापर्यंत महिला तस्करी, बलात्कार, बाललैंगिक गुन्ह्यामध्ये वाढ झालीय. २०१९ मध्ये नागपुरात महिला तस्करीचे १८, बलात्काराचे १३६, बाललैंगिक अत्याचार पोक्सोचे २०० गुन्हे दाखल होते. तर २०२० मध्ये त्यात वाढ होऊन महिला तस्करीचे ३३ गुन्हे, १७२ बलात्काराचे गुन्हे, २३८ पोक्सोचे गुन्हे नोंदवले गेलेय. तर यंदा १ जानेवारी २०२१ ते ऑगस्ट २०२१ या आठ महिन्यात नागपुरात महिला तस्करीचे १०, बलात्काराचे १४९, बाललैंगिक पोक्सोचे १४२ गुन्हे दाखल झाले. यामुळे नागपूरात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    फक्त गुरूजींनाच मुख्यालयाची सक्ती का?

    January 18th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveशिक्षक संघटना आक्रमक नागपूर/ कुही : जिल्ह्यातील कुही तालुका अंतर्गत गावखेड्यातील कारभार गतिमान व्हावा, यासा...

    जेष्ठ व दिव्यांगांच्या मदतीसाठी राष्ट्रीय वायोश्री य...

    February 26th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: नागपूर शहर आणि जिल्ह्यातील जेष्ठ नागरिक तसेच दिव्यांगांना केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवू...

    कुसुमलता वाकडे यांना ” साहित्य सेवा सन्मान &#...

    September 7th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: मराठीचे शिलेदार बहुउदेशीय संस्था नागपूरतफे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन ऊरवेला काॅलनी येथे...