मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सत्ता स्थापनेनंतर पहिल्यांदा भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. १२ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री खात रोड रेल्वे मार्गावर जाहीर सभा घेणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांचे दुपारी १२ वाजता शासकीय विमानाने नागपूर विमानतळावर आगमन होणार आहे. तेथून ते पुढे हेलिकॉप्टरने गोसीखुर्द धारण हेलिपॅडवर पोहोचतील .तेथे ते गोसीखुर्द जलपर्यटन तसेच प्रकल्पाची पाहणी करणार आहेत. त्यांनतर ते भंडारा येथील खांब तलावाच्या सौदर्यीकरणाचे उदघाटन करतील . तसेच भुयारी गटार योजनेतील कामाचेही भूमिपूजन करणार आहेत. त्यानंतर ते मुंबईला रवाना होतील .
नागपूर- मुख्यमंत्री शिंदेची विदर्भात पहिलीच जाहीर सभा
