1. Doha bound IndiGo flight diverted to Pakistan's Karachi due to a medical emergency onboard. 2. 'Naatu Naatu' from RRR wins the Oscar for the Best Original Song. 3. India's 'The Elephant Whisperers' wins Oscar award for the Best Documentary Short 1. मुंबई : कमला नगरमधील झोपडपट्टीत लागली भीषण आग.  2. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर 'फीडबॅक युनिट' या कथित स्नूपिंग प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत खटला चालवण्यास गृह मंत्रालयाने दिली मंजुरी. 3. हरित ऊर्जेला मुख्य प्राधान्य देण्याच्या भारत सरकारच्या निर्णयामुळे खुश आहे: डेन्मार्कचे एन्व्हॉय.

Nagpur : G20 चा खर्च दोनशे कोटींच्या घरात

Nagpur G20

नागपूर (Nagpur) : ‘जी-२०’ (G20) बैठकीनिमित्त राज्य सरकारनेही तिजोरी उघडली असून, जवळपास पावणेदोनशे कोटींचा निधी देणार आहे.

नागपूर शहरात पहिल्या टप्प्यात रस्ते दुरुस्ती, सौंदर्यीकरण आदी कामासाठी ५० कोटी मंजूर केले आहे. याशिवाय महापालिकेने १२२ कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला असून, तोही मंजूर होण्याची शक्यता आहे. महापालिकेनेही २४ कोटींची कामे स्वतःच्या निधीतून सुरू केली आहे. ‘जी-२०’ बैठकीनिमित्त शहराचा कायापलट होत असून, एकूण दोनशे कोटींपर्यंत खर्च येणार आहे.

येत्या मार्चमध्ये जी-२० बैठकीसाठी जवळपास ३८ देशांचे मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी, त्यांचा स्टाफ नागपुरात येणार असून तीन दिवस मुक्काम राहणार आहे. दोन दिवस बैठकीचे राहणार असून येणाऱ्या पाहुण्यांसाठी त्यांच्या देशातील पदार्थांसोबत मराठमोळी पुरणपोळी, झुनका भाकरीचाही जेवणाच्या ‘मेन्यू’त समावेश राहणार आहे. ‘जी २०’ परिषदेअंतर्गत बैठकीसाठी नागपुरात येणाऱ्या परदेशी पाहुण्यांचे स्वागत आणि सरबराईसाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू झाली आहे.

शहरातील रस्ते चकाचक होत असून नवीन पथदिवे, रस्त्यांच्या बाजूने हिरवळ, रोषणाई करण्यात येत आहे. यासाठी जवळपास दोनशे कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे. त्यांच्या स्वागतासाठी कुठेही कमतरता राहणार नाही, याबाबत महापालिका प्रशासन दक्ष आहे. विदेशी पाहुणे तीन दिवस नागपुरात राहणार असून त्यांच्या राहण्याची व्यवस्था लि मेरेडियन तसेच रेडीसन ब्लू येथे करण्यात आली आहे. या दोनपैकी एका हॉटेलमध्ये बैठक होणार आहे.

RENUKA KINHEKAR

RENUKA KINHEKAR

All Posts

Latest News

“Cloud & Metaverse Summit 2023”; तं...

February 25th, 2023 International

Related Post

‘वीर सावरकरांनी महात्मा गांधींच्या सूचनेवरूनच ...

October 13th, 2021 | RAHUL PATIL

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हिंदुत्वाचे प्रतीक असणाऱ्या वीर सावरकर यांनी महात्मा गांधींच्या सूचनेवरून अंदमान...

भाजपाचे तब्बल 24 आमदार TMC च्या संपर्कात

September 7th, 2021 | RAHUL PATIL

पश्चिम बंगालमधील तृणमूलच्या मोठ्या विजयानंतर भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांच्या घरवापसी होताना पाहायला मिळत आहे. यातच आता ज्ये...

युक्रेनने पंतप्रधान नरेंद्र मोदींना का घातले साकडे?

March 7th, 2022 | RAHUL PATIL

रशिया युक्रेन युद्धाचा आजचा ११ वा दिवस आहे. अजूनही रशियन लष्करची युक्रेनवर कारवाई सुरूच आहे. त्यामुळे युक्रेनचे परराष्ट्र ...