नागपूर: सन २०२१-२०२२ चे सुधारित व २०२२-२०२३ या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प नागपूर महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांनी आज १३ एप्रिल रोजी नागपूर महानगरपालिका ऑफिस येथे सादर केला. यावेळेस नागपुरातील विकास कामांवर भर देत नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील याचा विचार या अर्थसंकल्पात केला आहे. सन २०२१-२०२२ या अर्थसंकल्पात रु २३९२.६२ कोटी निव्वळ ह्या वर्षाचे उत्पन्न असेल. तर सुरवातीची शिल्लक रु. ९४. २५ कोटी इतकी असून सन २०२१-२०२२ चे सुधारित उत्पन्न रु. २४८६. ८७कोटी राहील. तर सन २०२२-२०२३ या वर्षाचे अंदाजित उत्पन्न रु. २६५७. १३ कोटी राहण्याचा अंदाज आहे.सॅन २०२१-२०२२ ह्या वर्षात एकूण खर्च २४५९. ३१ कोटी राहील. सन २०२२-२०२३ ह्या वर्षातील एकूण खर्च रु. २६६९. ३३ कोटी असेल.
चालण्यायोग्य मार्गिका (walkable corridor):- नागपूर शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी तसेच अपघात टाळण्यासाठी रस्त्याला लागून पादचारी मार्गावरून नागरिकांना चालण्यायोग्य मार्गिका उपलब्ध करून देणे व पायी चालण्याची प्रवृत्तीत वाढ होण्याच्या हेतूने चालण्यायोग्य मार्गिका प्रस्तावित आहे. या कामाकरिता २०२२-२३ चे प्रातवित अंदाजपत्रकात रु. १०. ०० कोटीची तरतूद करण्यात आलेली असून, प्रायोगिक तत्वावर नागपुरातील ५ रस्त्यांची निवड करण्यात आलेली आहे. हि सर्व कामे world resources institute (NGO) या संस्थेच्या मार्गदर्शनातून करण्यात येणार आहे.
खड्डे विरहित रस्ते ( Potholes free roads ) :-नागपूर शहरातील रस्ते खड्डे विरहित ठेवण्याकरिता मनपा हॉट मिक्स प्लांट कडून शहरातील विविध भागात रस्ता दुरुस्तीकरणाचे कार्य सुरु आहे. ना.सु. प्र चे हॉट मिक्स प्लांट च्या सहकार्यांनी कामे केली जातात तसेच पावसाळ्यात जेट पॅचर व इन्स्टा पॅचरचा वापर करून खड्डे दुरुस्ती करण्यात येतात. २०२२-२०२३ च्या अंदाजपत्रकात रु. १६३०. ५० लक्ष रकमेची तरतूद करण्यात आली आहे.
तसेच नागपूर शहरातील १२ मी. पेक्षा कमी रुंदीच्या अंतर्गत रस्त्यासंबंधाने ज्या डांबरी रस्त्यांवरील वाहतूक वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे व त्यावर वारंवार डांबरी पृष्ठभाग दुरुस्तीकरीता येणार खर्च टाळण्याकरिता डांबरी रस्त्यांवर सिमेंट काँक्रीट ठार देऊन दीर्घकाळ सुस्थित राहतील याकरीता white topping रस्ते तयार करणे, याकरिता २०००. ०० लक्ष रकमेची तरतूद करण्यात आली आहे.
मॅनहोल दुरुस्ती, मॅनहोल कव्हर्स मालवाहिनी नाली सुस्थिती इ कामाच्या अंबलबजावणी करीत १२००.०० लक्ष रकमेची तरतूद केली आहे.
प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घटक क्र. ३ आणि घटक क्र. ४ प्रकल्पाचे कामे प्रगतिपथावर आहे. वंजारा येथे सुमारे २३०० घरकुलांचे निययोजन करण्याचे मानस आहे.
१००० मे. टन प्रति दिवस घनकचऱ्याची प्रक्रिया केंद्रे उभारणार.
नागपूर शहरात नवीन बटर फ्लाय उद्यान, सुगंधी उद्यान, रोज उद्यान, आयुर्वेदिक उद्यान, कॅक्टस उद्यान ( जैवविविधतेसाठी),संवेदना उद्यान ( अंध, कर्णबधीर, ऑटिझम लोकांसाठी) उधाणार आहे.
मागील वर्षात शहरात विविध ठिकाणी ११ लघु सांडपाणी शुद्धीकरण सयंत्र (Mini STP ) उभारण्यात आलेले आहे व यास उत्तम प्रतिसाद असल्याने या आर्थिक प्रतिसाद असल्याने या आर्थिक वर्षात आणखी ३ ठिकाणी लघु सांडपाणी शुद्धीकरण सयंत्र ( Mini STP ) उभारण्याचे प्रस्तावित आहे.
मनपा शाळेतील वर्गखोली डिजिटल करणारा हे. प्रत्येक शाळा इमारतीत १ वर्गखोली डिजिटल करावयाची झाल्यास ९० वर्गखोल्या digital कराव्या लागतील. यासाठी ३.०० कोटी तरतूद करण्यात आले आहे.