नागपूरला आतापर्यंत कोरोनाच्या दोन लाटांचा सामना करावा लागला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून सावध राहायला “कोविड-१९ प्रीप्रेअरडनेस” कार्यक्रम घेण्यात आला. येत्या काही महिन्यांत कोरोनाच्या स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी हॉटेल सेंटर पॉईंट, नागपूर येथे प्रभावती ओझा स्मृती सेवा संस्था (POSSS), नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स (NVCC) आणि विदर्भ करदाता संघटना (VTA) यांच्याद्वारे “कोविड-१९ प्रीप्रेअरडनेस” या विषयावर एक कॉन्क्लेव्ह आयोजित करण्यात आली होती.
या प्रसंगी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (virtually present), पालकमंत्री व राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, आयएएस – जिल्हाधिकारी नागपूर जिल्हा- विमला आर, आयएएस – नागपूर महानगरपालिका आयुक्त- राधाकृष्णन बी, आणि आयपीएस – पोलीस आयुक्त नागपूर- अमितेश कुमार, यांनी उपस्थित राहून सदस्यांना या विषयावर तपशीलवार सविस्तर सांगितले.
तिन्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यापूर्वी पहिल्या आणि दुसऱ्या लाटे दरम्यानचे अनुभव शेअर केले आणि सदस्यांना सूचित केले की तिसरी लाट टाळण्याची एकमेव उपाय म्हणजे कोविड प्रोटोकॉलचे पालन करणे. तसेच त्यांनी आश्वासन दिले की ते तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी सुसज्ज आहेत, जेव्हा परिस्थिती उद्भवेल तेव्हा मात्र कोविड निर्बंध लागू करण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची तितकीच आवश्यकता असेल.
पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आपल्या भाषणात व्यापारी, उद्योगपती, करदाते आणि नागरिकांना आश्वासन दिले की भविष्यातील निर्बंधांवरील कोणताही निर्णय संबंधितांशी सल्लामसलत केल्यानंतरच घेतला जाईल. त्यांनी लसीकरण 100% केले गेले पाहिजे यावर जोर दिला आणि रुपये दहा लाख, 100% लसीकरण साध्य करणाऱ्या कोणत्याही महानगरपालिकेला दिले गेले पाहिजे असेही ते म्हणाले. डॉ. राऊत म्हणाले, नागरिकांच्या सुरक्षित आरोग्यासाठी मी वचनबद्ध आहे, म्हणून काही वेळा पूर्वी निर्बंधांवर निर्णय लागू केले गेले आणि भविष्यातील कोणत्याही निर्णयामध्ये बहुसंख्य मुख्य व्यापार आणि उद्योग संघटनांचा सक्रिय सहभाग असेल.