नागपूर: नागपुरातील वादग्रस्त वकील सतीश उके (satish uke) यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)आज सकाळी छापेमारी केली. ईडीचे पथक सकाळीच सतीश उके यांच्या नागपुरातील घरी दाखल झाले होते. जमिनीच्या व्यवहारप्रकरणी हा छापा टाकण्यात आल्याची माहिती आहे. चौकशीनंतर ईडीने सतीश उके यांना ताब्यात घेतलं. सतीश उके हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील आहेत.
अॅड.सतीश उके यांच्या पार्वतीनगर येथील घरी गुरुवारी, सकाळी सक्तवुसली संचालनालयाने (ईडी) छापा टाकला होता. केंद्रीय राखीव पोलिसदलाच्या जवानांसह उके यांच्या घरी धडकले. पथकात महिला अधिकाऱ्यांचाही समावेश होता. सकाळपासून झाडाझडती घेतल्यानंतर ईडीने उके यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, उके यांच्या अटकेची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.
ईडीचे नऊ अधिकारी आणि दोन महिला अधिकारी उके यांच्या घरात दाखल होते. तसंच सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले होते. सतीश उके यांच्या घराबाहेर परिसराला छावणीचं स्वरुप आलं आहे.