नागपूर: नागपूर काँग्रेस कमिटीने काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या (Congress) हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi )यांना समन्स बजावल्याप्रकरणी नागपूर काँग्रेस कमिटीने ईडी कार्यालयाबाहेर निदर्शने केली.
काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष विकास ठाकरे, काँग्रेसचे माजी ग्रामीण अध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. नॅशनल हेराल्डशी संबंधित ‘खोट्या’ मनी लॉन्ड्रिंगमध्ये गांधींवर आरोप करण्यात आल्याचा काँग्रेसचा दावा आहे.
गांधी यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचे कारस्थान मोदी सरकार रचत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी शनिवारी केला. ईडीने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना खोट्या प्रकरणात अडकवून नोटीस पाठवल्या आहेत जे केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने रचलेले षड्यंत्र आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे यावरून स्पष्ट होते. केंद्राच्या हुकूमशाही वृत्तीचा निषेध करण्यासाठी १३ जून रोजी हे आंदोलन करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.
काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) नॅशनल हेराल्ड प्रकरणी आज ईडीसमोर (ED) आपला जबाब नोंदवणार. याकरीता सोमवार दिनांक 13 जून रोजी सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी ईडीसमोर हजर होणार होते. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर निदर्शने केली असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.