नागपूर: देशाच्या प्रथम नागरिक म्हणून एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) विजयी. द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी थोडे जाणून घेऊया.
जन्म – २० जून १९५८
स्थळ – रायरंगपूर , ओडिशा
शिक्षण – बी. ए. रमादेवी महिला महाविद्यालय, भुवनेश्वर
१९९७ – राजकीय कारकिर्दीला एक वार्ड काऊन्सलर म्हणून सुरुवात केली.
त्यानंतर रायरंगपूर नगर परिषदेत त्या नगरसेविका झाल्या, त्यांनी काही काळ नगर परिषदेचं उपाध्यक्षपदही भूषवलं.
२००० – भाजपच्या तिकीटावर रायरंगपूर विधानसभा मतदाससंघातून आमदार म्हणून निवडून आल्या.
२००७- मुर्मू यांना ओडिशा विधानसभेने सर्वोत्कृष्ट आमदाराचा नीलकंठ पुरस्कार प्रदान केला होता.
२००९ -द्रौपदी मुर्मू दुसऱ्यांदा आमदार झाल्या.
२०१५- द्रौपदी मुर्मू या भाजपच्या मयूरभंज जिल्हा अध्यक्ष म्हणून काम पाहत होत्या. त्यावेळी त्यांना पहिल्यांदा राज्यपाल बनवण्यात आलं.
१८ मे २०१५ रोजी मुर्मू यांनी झारखंडच्या पहिल्या महिला, तसंच पहिल्या आदिवासी राज्यपाल म्हणून कार्यभार हाती घेतला.
द्रौपदी मुर्मू या एनडिएच्या उमेदवार होत्या. राष्ट्रपतीपदी त्या निवडून आल्यावर त्यांचे सगळ्यांनी स्वागत केले.