नागपूर: नेटफ्लिक्स (Netflix) वापरणाऱ्या युजर्सना लवकरच मोठा धक्का बसणार आहे. जगातील सर्वात लोकप्रिय ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या नेटफ्लिक्सने आधीच 2023 च्या पहिल्या तिमाहीपासून पासवर्ड शेअरिंग फीचर्स बंद करण्याची घोषणा केली आहे.
कंपनीने नुकतेच आपले तिमाही रिझल्ट जाहीर केले आहेत. युजर्सनी आपले नेटफ्लिक्स अकाउंट शेअर केल्यामुळे कंपनीच्या कमाईत घट झाल्याचे नेटफ्लिक्सने म्हटले आहे. कंपनीने गेल्या वर्षाच्या अखेरीस पासवर्ड शेअरिंगवर बंदी घातल्याची माहिती दिली होती. नेटफ्लिक्सने आता स्पष्ट केले आहे की, अकाउंट पासवर्ड शेअर न केल्याने कंपनीला युजर्स वाढण्यास मदत होत आहे.
Netflix FAQ पेजवरील पोस्टनुसार, सिंगल नेटफ्लिक्स अकाउंटला आता फक्त एकाच घरात राहणारे लोकच अॅक्सेस करू शकतील. जे त्याच पत्त्यावर राहत नाहीत, त्यांना प्रायमरी अकाउंट होल्डर म्हणून नेटफ्लिक्स पाहण्यासाठी त्यांचे स्वतःचे अकाउंट वापरावे लागेल. आता ग्राहकांच्या घराबाहेर राहणाऱ्या युजर्ससोबत पासवर्ड शेअर करणे खूप कठीण होणार आहे. तसेच, सिंगल नेटफ्लिक्स अकाउंट वेगवेगळ्या ठिकाणी शेअर करण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त खर्च येऊ शकतो.
जर प्रायमरी अकाउंटसोबत लिंक केलेले नवीन डिव्हाइस वेगळ्या ठिकाणी असल्यास नेटफ्लिक्स प्ले करण्यासाठी 4-अंकी कोड आवश्यक असणार आहे. या कोडला रिक्वेस्ट अॅक्सेस केल्यानंतर 15 मिनिटांच्या आत इंटर करण्याची गरज आहे. दरम्यान, दुसऱ्या लोकेशनमध्ये डिव्हाइसला फक्त 7 दिवस नेटफ्लिक्स अकाउंट चालवण्याची परवानगी असणार आहे. नेटफ्लिक्सचे म्हणणे आहे की, प्रायमरी डिव्हाइससह प्रवास करणार्या युजर्सला इतर लोकेशनमध्ये नेटफ्लिक्स चालविण्यास कोणतीही अडचण येणार नाही. चांगल्या आणि सुलभ नेटफ्लिक्स अॅक्सेससाठी युजर्सला आपल्या प्रायमरी लोकेशनवर दर 31 दिवसांच्या आत वाय-फायशी कनेक्ट करावे लागेल.
सर्व देशांमध्ये बंद होईल पासवर्ड शेअरिंग फीचर
नेटफ्लिक्सने अर्जेंटिना, अल साल्वाडोर, ग्वाटेमाला, होंडुरास आणि डोमिनिकन रिपब्लिक यांसारख्या लॅटिन अमेरिकन देशांमध्ये पासवर्ड शेअरिंग फीचर बंद करण्यासंबंधी टेस्ट सुरू केली आहे. जर युजस्स आपल्या घराबाहेर दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ नेटफ्लिक्स अकाउंट चालवत असतील तर त्यांना जवळपास 3 डॉलर
अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. सध्या इतर देशांमध्ये या फीचरच्या रोल आउटबद्दल कोणतीही माहिती नाही. पण 2023 मध्ये पासवर्ड शेअरिंग फीचर इतर देशांमध्येही बंद केले जाऊ शकते.
नेटफ्लिक्सचा फोकस रेव्हेन्यूवर
आपला महसूल वाढवण्यासाठी नेटफ्लिक्स जाहिरातींवर देखील खूप लक्ष देत आहे. कंपनीने 2022 मध्ये जाहिरात-आधारित योजना लॉन्च केली, ज्याची किंमत प्रति महिना 6.99 डॉलर (सुमारे 572 रुपये) आहे. ही योजना ऑस्ट्रेलिया, ब्राझील, यूके, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको आणि अमेरिकेमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- online casino india
- best online casino in india
- best online casino india
- online casino india real money
- online casino in india
- online casino games in india
- online casino games india
- online casino real money india
- best casino in india online
- online casino games for real money
- casino in india online
- casino games india
- best casino in india
- online casino game real money
- casino india online
- crazy time casino india
- casino online india
- online casino play for real money
- casino games in india
- best online live casino india