नागपूर:नेटफ्लिक्स आता स्वस्त ओटीटी स्ट्रीमिंग प्लॅन आणणार आहे.यासाठी नेटफ्लिक्सने आता मायक्रोसॉफ्ट सोबत हातमिळवणी केली आहे. नेटफ्लिक्स जाहिरातीसह (AD- SUPPORT) असलेल्या सब्स्क्रिप्शनसाठी मॅक्रोसॉफ्टसोबत भागीदारी करणार. नेटफ्लिक्स कंपनीने सांगितले आहे कि, मॅक्रोसॉफ्ट जागतिक तंत्रज्ञ आणि विक्रीमध्ये साहाय्य करेल. नेटफ्लिक्सने एप्रिल महिन्यात ऍड सपोर्ट सब्स्क्रिशन प्लॅनची घोषणा केली.
नेटफ्लिक्स कंपनी स्वतःची जुनी जाहिरात विना सब्स्क्रिप्शन देण्याची योजना बदलण्याची घोषणा काही काळाआधीच केली होती. पण आता नेटाफिल्क्स मायक्रोसॉफ्ट बरोबर भागीदारी करण्याची घोषणा केली आहे. या नवीन भागीदारीमुळे नेटफ्लिक्स आता युझरला कमी किंमतीत सब्स्क्रिप्शन प्लॅन देण्याची नेटफ्लिक्सची योजना आहे.
नेटफ्लिक्सने १५ वर्ष स्ट्रीमिंग कॉन्टेन्ट जाहिरातने दाखवण्याची योजना आता बदलली आहे. आता नेटफ्लिक्सकडुन युझरला सर्वात कमी किमतीत सब्स्क्रिप्शन प्लॅन देण्याचा प्रयत्न असेल. या स्बस्किप्शनमध्ये स्ट्रीमिंगच्यावेळी जाहिराती दिसतील. मागील काही महिन्यात अनेक युझरने नेटफ्लिक्सकडे पाठ फिरवली. त्यामुळे आता मायक्रोसॉफ्टच्या मदतीने नेटफ्लिक्स तोटा भरून काढण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे.