गुजरात मध्ये विजय रुपाणी यांच्या जागी नियुक्त केलेल्या भूपेंद्र यादव यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात सर्व नवे मंत्री सहभागी झाले आहेत. रुपाणी मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना घरचा रस्ता दाखविला आहे.
भूपेंद्र पटेल यांचा बुधवारी शपथविधी होणार होता. मात्र, नव्या चेहऱ्यांच्या समावेशावरून पक्षात प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. रुपाणी समर्थक आमदारांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. गुजरात मुख्यमंत्री कार्यालयातून दिलेल्या माहितीनुसार आज सायंकाळी साडेचार वाजता गांधीनगर येथे कॅबिनेट बैठक होणार आहे.
हे आहेत नवोदित मंत्री
राजेंद्र त्रिवेदी
जितेंद्र वघानी
ऋषिकेश पटेल
पूर्णश कुमार मोदी
राघव पटेल
उदय सिंह चव्हाण
मोहनलाल देसाई
किरीट राणा
गणेश पटेल
प्रदीप परमार
हर्ष सांघवी
जगदीश ईश्वर
बृजेश मेरजा
जीतू चौधरी
मनीषा वकील
मुकेश पटेल
निमिषा बेन
अरविंद रैयाणी
कुबेर ढिंडोर
कीर्ति वाघेला
गजेंद्र सिंह परमार
राघव मकवाणा
विनोद मरोडिया
देवा भाई मालव
निमा आचार्य विधानसभा अध्यक्ष
गुजरात विधानसभा अध्यक्षपदी निमा आचार्य यांची निवड केली आहे. राजेंद्र त्रिवेदी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांना मंत्री बनविण्यात आले आहे.