नागपूर: सध्या समाजमाध्यमांवर पॉडकास्ट मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. पॉडकास्ट विषयायीची आतुरता पाहता ट्विटर देखील पॉडकास्टचे फिचर आणण्याच्या तयारीत आहे. ट्विटरचा लाईव्ह ऑडिओ प्रॉडक्ट स्पेसेस मागील दोन वर्षांपासून चांगलाच लोकप्रिय झाला आहे. हे पाहत कंपनीने आणखी एक ऑडिओ फिचर सादर करण्याची योजना आखली आहे.
रिव्हर्स इंजिनीअर जेन मांचुन वांग यांनी हे फिचर सॉप्ट केले आहे. त्यांनी याचा एक स्क्रीनशॉट सामायिक केला आहे. त्यानुसार ट्विटरच्या अँपमध्ये बॉटम मेन्यूमध्ये एक मायक्रोफोन आयकॉन दिसत आहे. या आयकॉनवर टॅप केल्यानंतर वापरकर्ते पॉडकास्ट पेजवर रीडायरेक्ट केले जाणार आहे. असे असले तरी हे नवीन फिचर कसे काम करेल, याविषयी अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. अँप संशोधक अलेसांडो पलुझी यांनी पोस्ट केलेल्या या स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही पाहू शकता, Twitter साइडबारमधील नवीन पॉडकास्ट विभागाची चाचणी करत आहे.
सर्व वापरकर्त्यांसाठी हे पॉडकास्ट टॅब उपलब्ध होण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. ट्विटरने २०२० साली क्लब हाऊस ऑडिओ अँपच्या धर्तीवर स्पेस फिचर आणले होते. ते अत्यंत लोकप्रिय झाले आहे. मात्र सोशल पॉडकास्ट मंच ब्रेकरने कंपनी विकत घेतल्यानंतर त्याचा ऑडिओ सेवांमध्ये काही बदल करण्यात आले आहे.