राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयए आणि स्थानिक जम्मू-काश्मीर पोलिसांनी एकत्रितपणे आज काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी छापे घातले. दहशतवादी कृत्यांना जबाबदार असलेल्या आणि बंदी घालण्यात आलेल्या एमात-ए-इस्लामी या संघटनेला होणाऱ्या फंडिंगच्या प्रकरणात हे छापे घालण्यात आले. यात गांदरबल, बडगाम, बंदीपोरा आणि शिपोया सहित अनेक जिल्ह्यांत एकाचवेळी ही कारवाई करण्यात आली. यात देनसर येथे एका सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्याच्या घरावरही छापा मारण्यात आला.
जमातला तुर्की संघटना मुस्लीम बदरहूडची मदत
तुर्कीतील मुस्लीम बदरहूड या संघटनेच्या मदतीने काश्मिरी तरुणांचे ब्रेन वॉशिंग करण्याचे काम जमात-ए-इस्लामी करत असल्याची माहिती आहे. दहशतवादी कारवायांमध्ये वाढ करण्यासाठी जमात-ए-इस्लामी सातत्याने प्रयत्नशील आहे. शरीयतच्या कायद्यानुसार समाज आणि राजकारण व्हावे, अशी जमात-ए-इस्लामीची धारणा आहे.
जमातचे सदस्य तुर्कीतील मुस्लीम ब्रदरहुडच्या नियमांचे पालन करत असल्याची माहिती आहे. जमातमधील महत्त्वाचे नेते हे सातत्याने मुस्लीम ब्रदरहुडच्या संपर्कात आहेत. विविध मुद्द्यांवर तुर्कीतून मिळणाऱ्या सूचनांनुसार आणि मार्गदर्शनाद्वारे ते काम करतात. काश्मिरातील तरुणांनी कट्टरवादी व्हावे, यासाठी मानसिकता बदलण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
जमात ए इस्लामी हिज्ब-उल-मुजाहिदीन यांच्यासोबतही काम करत असल्याची माहिती आहे. ती त्यांची ऑपरेशन विंग आहे. हिज्ब उल मुजाहिदीनच्या कारवायांसाठी पाया तयार करण्याचे काम जमात ए इस्लामी करते. मुस्लीम समाजातील शिक्षितांना कट्टरवादाकडे वळवण्याचा जमातचा प्रयत्न आहे. यात काश्मिरातल्या काही सराकरी नोकरदार वर्गाचाही समावेश आहे