निर्वाण फाउंडेशन, नाशिकच्या वतीने देण्यात येणारा “इंटरनॅशनल आयडॉल अवॉर्ड-2021” श्रीमती माधुरी पाटील-शेवाळे,प्राथमिक शिक्षिका,जि.प.शाळा,मोडाळे ता.इगतपुरी यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात ‘मराठीचे शिलेदार प्रकाशन’ नागपूरतर्फे निर्मित त्यांच्या “मधुवेल” या पहिल्या वहिल्या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
‘आदित्य हॉल’, इंदिरानगर, नाशिक येथे संपन्न झालेल्या दिमाखदार सोहळ्यास मा.शिल्पी अवस्थी-मिसेस इंडिया इंटरनॅशनल युनिव्हर्स क्वीन, मा. सनासी बिडोम-आफ्रिकन तज्ञ आणि समाजसेवक, मा.आरती हिरे-प्रसिद्ध गिर्यारोहक, मा.विमल बोढारे-विश्वस्त -निर्वाण फाउंडेशन नाशिक, मा.निलेश आंबेडकर, अध्यक्ष-निर्वाण फाउंडेशन, नाशिक हे मान्यवर उपस्थित होते.
माधुरी पाटील या उपक्रमशील शिक्षिका असून त्यांच्या “दालन संस्कार कथांचे” या उपक्रमाची दखल “रेडिओ विश्वास-90.08 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं…तुमचा आवाज…” यांनी घेतली असून सोमवार दिनांक २० सप्टेंबर २०२१ पासून रोज रात्री ९. ३० वाजता संस्कार कथा प्रसारित केल्या जाणार आहेत. त्यांच्या यशाबद्दल प्रकाश शेवाळे, अशोक खैरनार, श्रीमती रत्नमाला खैरनार, हरिभाऊ कुलकर्णी, सिध्दार्थ सपकाळे,अंकित शेवाळे, संकेत शेवाळे, प्रवीण पाटील, राजेंद्र पाटील, राहुल पाटील, प्रतापराव शिंदे यांनी अभिनंदन केले. माधुरी पाटील, शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातील एक प्रतिभावंत व्यक्तीमत्व. कविता, कथा, चारोळी, लेख या सर्वच साहित्य प्रकारामध्ये त्यांनी आपल्या प्रतिभेने आणि सर्जनशीलतेने स्वतंत्र अशी ओळख निर्माण केलेली आहे. विविध समुहातील मानाचे पुरस्कार त्यांना लाभलेले आहेत. त्यांच्या साहित्य रचना वाचल्या की, त्यांच्या प्रतिभेची ऊंची आपल्या लक्षात येते. नोकरी करीत असताना त्यांनी साहित्य वाचन आणि लेखनाची आवड जपलेली आहे.