1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

नितेश राणेंना कोल्हापूरला हलविले; छातीत दुखू लागल्याने रूग्णवाहिकेतून रवाना

Spread the love

भाजपाचे आमदार नितेश राणे यांचा कोठडीमधील मुक्काम वाढला आहे. नितेश राणेंना कोर्टाने १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान त्यांच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालयामध्ये आज होणारी सुनावणीही पुढे ढकलण्यात आली आहे. लता मंगेशकर यांचं निधन झाल्याने आज राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याने न्यायालयाचे कामकाज बंद राहणार आहे. त्यामुळे आज सुनावणी होणार नाही. दरम्यान नितेश राणे यांना कोल्हापूरला नेण्यात आले आहे.

नितेश राणेंनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. यानंतर त्यांना कोल्हापूरला नेले जात आहे. रुग्णवाहिकेतून नितेश राणे यांना घेऊन पोलीस कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत. शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील खुनी हल्लाप्रकरणी नितेश राणे यांना अटक करण्यात आली आहे.

नितेश राणे यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण त्याच दिवसापासून छातीत दुखू लागलं होतं. रुग्णालयात योग्य ह्रदयरोगतज्ज्ञ नसल्याने त्यांना कोल्हापूरला हलवण्याचा निर्णय घेतला होता. पण साखर कमी झाल्याने तसंच मणक्याचा त्रास यामुळे त्यांना तातडीने हलवण्यात आले नव्हते. पण आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना कोल्हापूरला नेण्यात आले असून कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. नितेश राणे यांच्यासोबत पोलिसांचं आणि डॉक्टरांचे पथकही रवाना झाले आहे.

नितेश राणेंच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालयामध्ये आज म्हणजेच सोमवारी दुपारी दोन वाजल्यानंतर सुनावणी होणं अपेक्षित होते. मात्र भारतरत्न लता मंगेशकर यांचं दु:खद निधन झाल्याने राज्य सरकारने दुखवटा जाहीर करत सुट्टीची घोषणा केलीय. राज्य सरकारशीसंबंधित सर्व कार्यालयांबरोबरच न्यायालयीन कामकाज आणि बँकांचं कामकाजही बंद राहणार आहे. या सुट्टीचा आणि कामकाज बंद ठेवण्याच्या निर्णयाचा फटका नितेश राणेंच्या या सुनावणीला बसला आहे.

सध्या नितेश राणे न्यायालयानी कोठडीमध्ये आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. आता मंगळवारी त्यांच्या खटल्याची सुनावणी होणार आहे. तुरुंगामध्ये न जाता प्रकृती अवस्थेचं कारण देत नितेश राणे सिंधुदुर्ग रुग्णालयात दाखल झाले. आजची सुनावणी लांबल्याने त्यांचा मुक्काम वाढला आहे. सरकारी वकिलांनी जिल्हा न्यायालयामध्ये म्हणणं मांडण्यास पुरेसा वेळ मिळाला नसल्याची भूमिका मांडली. त्यामुळे सुनावणी पुढे ढकलावी अशी मागणी केलेली. तेव्हा नितेश यांनी सुनावणी न्या. रोटे यांच्यासमोर नको अशी मागणी केली होती.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    मुंबई-कर्नाटक प्रदेशाचे नाव बदलून ‘कित्तूर कर्नाटक’ ...

    November 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मुंबई-कर्नाटक प्रदेशाचे नाव बदलून ‘कित्तूर कर्नाटक प्रदेश’ ठेवण्य...

    महिला पोलिस कर्मचा-यासांठी आनंदवार्ता..!! आता 12 ऐवज...

    September 23rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveअमरावतीमध्ये शहर पोलिस दलामधील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी आता मह...

    ‘देशात फक्त कामगार शेतकरी चळवळच शिल्लक; राजू श...

    October 28th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशात आज फक्त कामगार आणि शेतकऱ्यांच्या चळवळी शिल्लक आहेत. त्या संपवण्याची व्यवस्था निर्माण होत आहे. दिल्लीत...