नागपूर: देशात इंधनाच्या किंमती वाढत असतांना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी एक मोठे विधान केले. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असताना,भारतातील वाहनांमधील पेट्रोलचा वापर पाच वर्षांनंतर नाहीसा होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
त्यांनी असे देखील म्हटले कि यांच्या काळात कार, गाड्या या ग्रीन हैड्रोजन, इथेनॉल फ्लेक्स इंधन, सीएनजी, एलएनजी यावर चालतील.
नितीन गडकरी यांना गुरुवारी अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३६ व्या दीक्षांत समारोहात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळेस केंद्रीय मंत्री निंतीन गडकरी यांना कृषी विद्यापीठाकडून “डॉक्टर ऑफ सायन्स” ने सन्मानित करण्यात आले.
गडकरी यांनी म्हटले कि आता विदर्भात तयार झालेल्या बायो- इथेनॉल चा वापर आता गाड्यांमध्ये केला जातो आहे. ग्रीन हायड्रोजनला विहिरीच्या पाण्याने बनविले जाईल आणि ७० रुपये प्रति किलो विकले जाईल. गडकरी यांनी असे देखील म्हटले कि, भारतातील वाहनांमधील पेट्रोलचा वापर पाच वर्षांनंतर नाहीसा होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
गडकरी यांनी असे देखील आवाहन केले कि कृषी संशोधक आणि तज्ज्ञ ह्यांनी येत्या पाच वर्षांत कृषी विकास 12 टक्क्यांवरून 20 टक्क्यांवर नेण्यासाठी काम करावे. महाराष्ट्रातील शेतकरी अतिशय हुशार आहेत, त्यांना नवीन संशोधन आणि तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.