1. Coronavirus pandemic live updates: India reports a single-day rise of 253 new Covid cases in India 2. ‘I carry India with me wherever I go’: Google and Alphabet CEO Sundar Pichai 3. Aaftab used Chinese knife to dismember Shraddha's body, chopped her 1. कोरोनाव्हायरस (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला लाइव्ह अपडेट्स: भारतात एकाच दिवसात 253 नवीन कोविड प्रकरणांची नोंद झाली आहे 2. ‘मी जिथे जातो तिथे भारताला माझ्यासोबत घेऊन जातो’: गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई 3. श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी आफताबने चायनीज चाकू वापरला, आधी तिचे हात कापले: सूत्र

NMC ELECTIONS: नवीन वर्षात मनपा निवणूक होण्याची शक्यता

Municipal elections

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांची प्रशासक म्हणून ५ मार्चपासून नियुक्ती करण्यात आली. त्यांची ६ महिन्यांची मुदत संपल्याने राज्य सरकारने प्रशासक पदाला पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे नागपूरसह १८ महापालिकांच्या निवडणूका नववर्षात होतील, असे संकेत दिले आहे.

नागपूर महापालिकेतील प्रशासक नियुक्तीचा कार्यकाळ सप्टेंबर २०२२ मध्ये संपत आहे. मात्र ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीसाठी निवडणूक प्रक्रिया पाच आठवडे थांबविण्याचे आदेश सर्वोच्य न्यायालयाने दिल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना निवडणूका सप्टेंबरपूर्वी पार पाडणार नसल्यामुळे प्रशासक नियुक्तीचा महत्तम कालावधी वाढवणे आवश्यक होते. यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशासकपदाला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नागपूरसह, मुंबई, ठाणे, नवी मुंबई महापालिकांसह राज्यातील १८ महापालिकांवरही प्रशासक असून, या महापालिकांवरही प्रशासक असून, या महापालिकांच्या निवडणुकाही ओबीसी आरक्षणाच्या प्रतीक्षेत आहे. सर्वोच्य न्यायालयाने ओबीसी आरक्षणाविषयी निकाल दिल्यानंतरच या निवडणुकीची प्रक्रिया सुरु होईल. त्यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत किंवा नवीन वर्षात या निवडणुका होऊ शकतात, असे सांगितले जाते.

मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबरमध्ये गुजरात विधानसभेच्या निवडणूका होत आहेत. या निवडणुकांनसोबतच नागपूर

महापालिकेसह महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणूका होतील, असा अंदाज होता. मात्र आता समीकरण बददललेले दिसत आहे

THE FREE MEDIA

THE FREE MEDIA

All Posts

Latest News

Related Post

‘उघडले देवाचे दार..!!’ राज्यमंत्री दत्ता...

October 7th, 2021 | RAHUL PATIL

आजपासून सर्व देवांची बंद असलेली दारे उघडण्यात आली आहे. मागील वर्षीपासून असलेल्या कोरोना संकटामुळे मंदिर बंद ठेवण्यात आली ह...

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची कामे गतीने कामे पूर्ण...

October 27th, 2021 | RAHUL PATIL

बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाची कामे गतीने पूर्ण करण्यात यावेत असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. बीडीडी च...

राज्यात नवीन ओमिक्रॉनचे ११ रूग्ण

December 23rd, 2021 | RAHUL PATIL

राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण जरी कमी झाल्याचे दिसत असले, तरी देखील आता ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत...