समृद्धी महामार्ग हा मंगरूळ चव्हाळा येथे असलेली आदिवासी आश्रम शाळा, त्या शाळेला पाण्याचा पुरवठा करणारी विहीर, आश्रम शाळेचे वाचनालय, शाळेतील खेळाचे मोठे मैदान तसेच मुलींचे प्रसाधन ( १० शौचालय) हे सर्व समृद्धी महामार्ग बांधणी दरम्यान तोडण्यात आले. शासनाकडून वारांवार संस्थेच्या कार्यकारी मंडळाला फक्त तोंडी आश्वासन देण्यात आले. मात्र आतापर्यंत समृद्धी महामार्गामध्ये उध्वस्त झालेल्या आश्रम शाळेत नवीन इमारतीच्या उभारणी शासकीय निधीमधून करण्यात आलेली नाही. त्यामुळे पारधी विद्यार्थी व पालकांच्या समवेत नागपूरला येऊन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन “रस्त्या वरील शाळा’ हे आंदोलन सुरु केले आहे. त्यांच्या खालील प्रमाणे काही प्रमुख मागण्या आहेत.
१) समृद्धी महामार्गामुळे उध्वस्त झालेल्या आदिवासी आश्रम शाळेकरिता नवीन पक्की सिमेंटची काँक्रीट इमारत बांधून द्यावी.
२) शासनाकडून मुलींकरिता पक्की १० शौचालय व १० पक्की स्नानगृह शासकीय निधीतून बांधून देण्यात यावी.
३) आदिवासी आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता पुस्तकांनी सुसज्ज तसेच फर्निचरसह एक पक्के वाचनालय बांधून देण्यात यावे.
४) आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना सतत बाराही महिने पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाकडून निधीतून १ मोठी विहीर बांधून देण्यात यावी.
५) विद्यार्थ्यांकरिता एक मोठे क्रीडांगण बांधून देण्यात यावे.
६) शाळेच्या चारही बाजूने सिमेंट संरक्षण भिंत शासनाकडून निधीतून बांधून देण्यात यावी.
७) आदिवासी मूळच्या जुन्या इमारतीला लागूनच शासनाची दहा एकर ई-क्लासची शेतजमीन आहे. हि शेतजमीन कायदेशीरपाने हस्तांतरित करण्यात यावी.
८) आदिवासी आश्रमशाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांकरिता ५००० ली. क्षमतेची पक्की सिमेंट काँक्रीटची पाण्याची टाकी बांधून देण्यात यावी.
अशा प्रकारच्या विविध मागण्या आदिवासी आश्रम शाळेच्या विद्यार्थी व पालकांनी शासना समोर ठेवल्या आहेत.